अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठारभागात व खांबे, शिंदोडी याभागात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीने कांदे, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रविवारी महसूल व कृषी विभागाचे आधिकारी यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगरच्या पठार भागात झालेल्या गारपीटग्रस्त भागाची महसूल व कृषी विभागाकडून पाहणी.. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिके जमिनदोस्त -शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील पठारभागातील डोळासणे, हिवरगांव पठार गावा अंतर्गत असलेल्या सतेचीवाडी, खांबे, शिंदोंडी गावा अंतर्गत असलेल्या भागवत व माने वस्ती या भागात अवकाळी पावसासह गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर, सगळ्यात जास्त खांबे परिसरातील शेतकर्यांच्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. त्याच बरोबर गहू, डाळींब आदि पिकांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. आधीच कोरोनाचे संकट, शेतीमाला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे, असे असतानाच आता पुन्हा गारपीटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे.
पिकांची पाहणी करताना अधिकारी.. अधिकाऱ्यांनी केली पाहणी -रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, आदींनी नुकसान ग्रस्त शेतकर्यांंच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. तालुका कृषी अधिकारी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्राथमिक अहवालानुसार अंदाजे 878 शेतकर्यांचे नुकसान झाले असून अंदाजे 357 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
हेही वाचा - वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट; काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान