ETV Bharat / state

प्रवरा नदीत उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, नागरिकांनी वाचवले - उक्कलगाव आठवाडी

घरगुती कारणाने रागाच्या भरात प्रवरा नदी पात्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला उक्कलगाव आठवाडी येथील नागरिकांनी वाचविले.

महिलेला वाचविताना नागरिक
महिलेला वाचविताना नागरिक
author img

By

Published : Mar 2, 2020, 7:46 AM IST

Updated : Mar 2, 2020, 2:57 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले आहे.

महिलेला वाचविताना नागरिक

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे रविवारी आठवडेबाजार होता. उक्कलगाव आठवाडी येथील एक २२ वर्षीय महिला रागाच्या भरात घरातून निघून प्रवरा नदी वरील पुलावर आली. मी विषारी औषध घेत असून नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत असल्याचे तिने पतीला फोनवर सांगितले. त्यानंतर लगेच पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली. आठवडे बाजारामुळे पुलावर नागरिकांची गर्दी असल्याने त्यांनी आरडाओरड करताच लोक बचावासाठी धावले. किरण बारहाते, दीपक महाडीक, दिलीप दायमा यांनी धाडस करत तिला पाण्याबाहेर काढले.

बेलापूर पोलीस ठाण्याचे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, बाळासाहेब गुंजाळ, निखील तमनर, पोपट भोईटे तातडीने घटनास्थळी आले. नंतर गावातील रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन करणार, इंदोरीकरांचा सावध पवित्रा

Last Updated : Mar 2, 2020, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.