ETV Bharat / state

Ahmednagar Rename :अहमदनगर नामांतर मुद्द्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले 'थोर व्यक्तींचे नाव समोर येत असेल तर स्वागत' - गोपीचंद पडळकरांचे मुख्मंत्री ठाकरेंना पत्र

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर (Rename Ahmednagar as Ahilyanagar) करा, अशी मागणी भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर (BJP Mla Gopichand Padalkar on Ahmednagar Rename) यांनी केली आहे.

gopichand padalkar and rohit pawar
गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार
author img

By

Published : Jun 3, 2022, 3:31 PM IST

अहमदनगर - अहमदनगरचे नाव अहिल्यानगर (Rename Ahmednagar as Ahilyanagar) करा, अशी मागणी भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर (BJP Mla Gopichand Padalkar on Ahmednagar Rename) यांनी केली आहे. पडळकर यांच्या या मागणीमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पडळकरांनी नामांतरासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा - पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे साजरी झाली. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित जयंतीचा कार्यक्रम केला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना चापडगाव (ता. कर्जत) येथे अडवण्यात आले. त्यानंतर पडळकर यांनी शरद पवार आणि रोहित पवारांवर जोरदार टीका केली.

आमदार पडळकरांचे पत्र - पडळकर यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, जेव्हा हिंदुस्तानातल्या मुसलमान राजवटीत हिंदू संस्कृती, मंदिरं फोडली जात होती, तेव्हा हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी याच हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला. म्हणून सर्व अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, ज्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर असे करावे. अहमदनगरच्या नामांतराचा तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही दाखवून द्या की, तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान करा. अशीही अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

शरद पवारांवर जोरदार टीका - नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगरमधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे येण्यापासून रोखले. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या बहिणीचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो, अशीही टीका शरद पवारांवर पडळकर यांनी पत्रात केली आहे.

रोहित पवार म्हणाले, चांगली गोष्ट - कुठल्याही शहराचे, भागाचे, जिल्ह्याचे, राज्याचे नाव जर बदलण्यासाठी थोर व्यक्तींचे नाव समोर येत असेल तर त्याचे स्वागत करण्यासारखंच आहे. अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासाठी पुढाकार घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण हे करत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जो निर्णय घेतील त्यांचं सर्वांनी स्वागत केले पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्याला काय विचार दिले की, सामान्य लोकांच्या हितासाठी काम केले पाहिजे, चांगले रस्ते असावेत, पिण्याचे पाणी चांगले असावे, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. हे विचार स्वीकारून त्यांनी दिलेला मार्ग असो किंवा इतर थोर व्यक्तींनी दिलेला मार्ग आत्मसात करून काम करणे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Gopichand Padalkar on Ahilyanagar : 'अहमदनगर' जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर'करा, गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.