ETV Bharat / state

हे कायद्याचे राज्य आहे का.. ? बलात्कार पीडितेला पतीसह विवस्त्र करून अमानुष मारहाण, अंगावर ओतले पेट्रोल

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामुदायिक अत्याचार झाला होता. त्याची तक्रार दिल्यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये वडील आणि भावासह एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या गुन्ह्याची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत होता. बलात्काराबाबत जिल्हा रूग्णालयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने आरोपी दबाव टाकत होते. यानंतर पुन्हा आता सामुहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बाधून विवस्त्र करून पेट्रोल टाकून अमानूष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

2016 मध्ये झाला अत्याचार; आता पुन्हा पतीसह नग्न करून पेट्रोल ओतत अमानुष मारहाण

author img

By

Published : Mar 2, 2020, 8:37 PM IST

अहमदनगर - सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बाधून विवस्त्र करून पेट्रोल टाकून अमानूष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा आरोप पीडित पती पत्नीने केला आहे. तसेच पोलिसांत तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे.

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामुदायिक अत्याचार झाला होता. त्याची तक्रार दिल्यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये वडील आणि भावासह एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या गुन्ह्याची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत होता. बलात्काराबाबत जिल्हा रुग्णालयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने आरोपी दबाव टाकत होते. विशेष म्हणजे, आरोपींविरूद्ध गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयासोबत सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.

मात्र, चार वर्षे उलटूनही सामूहिक बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्याचे चार्जशीट दाखल झालेले नाही. पीडित पती-पत्नीला ही फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता. 24 जानेवारीला पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर त्यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर एका बंदिस्त रूममध्ये या पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्यांच्याच कपड्यांनी त्यांना टांगण्यात आले. यानंतर पट्ट्याने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. 'फिर्याद मागे घ्या, अन्यथा मारून टाकू,' अशी धमकी दिली गेली. 'कोर्टात जाऊ नको असे सांगितले होते. तरीही तू गेला म्हणून तुझे हे हाल केले. आता गेले तर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी देण्यात आल्याचा पीडितांचा आरोप आहे.

हेही वाचा - पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा हवेत गोळीबार.. तरुणीला धमकावण्याचा प्रयत्न

मारायचा व्हिडिओ करून जर तुम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू, अशी धमकी देण्यात आली. जर तुम्ही फिर्याद दिली तर तू याठिकाणी आला होता आणि तू दुसऱ्या महिलेवर अत्याचार केला, अशी फिर्याद तुझ्यावर दाखल करेन, अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर पती-पत्नीने आम्ही तुमच्या विरोधात केस दाखल करणार नाही, असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना नगरला आणून सोडले.

तर मारहाण करताना आम्ही पोलीस आहोत, असेही हे दोन आरोपी सांगत होते. या प्रकरणात पोलिसांचेही नाव आल्याने पीडित पती-पत्नीला न्याय मिळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.