ETV Bharat / state

Ram Navami at Sai Temple : साई मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा; भक्तांची तुडुंब गर्दी - Crowd of devotees

शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने तीन दिवस साजरा करण्यात येणाऱ्या श्रीरामनवमी उत्‍सवाचा आज मुख्य दिवस असल्याने रात्रभर साई मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले ठेवण्यात आले आहे. लाखो भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. तर द्वारकामाई मंडळ, मुंबईच्‍या वतीने मंदिर प्रवेशद्वार, श्रीसाई प्रसादालय प्रवेशद्वार व लेंडीबागेत उभारण्‍यात आलेले भव्‍य देखावे आणि आकर्षक विद्युत रोषणाई या उत्‍सवाचे आकर्षण ठरले.

Ram Navami at Sai Temple
साई मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा
author img

By

Published : Mar 30, 2023, 8:50 PM IST

अहमदनगर : आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणुकीत संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वीणा, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी साईंची प्रतिमा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती उत्सव साजरा : सकाळी ०६.३० वाजता तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ. मालती यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. मीनाक्षी सालीमठ आणि प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍या हस्‍ते कावडीचे पूजन करण्‍यात आले.

न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांची सपत्नीक श्रींची पाद्यपूजा : सकाळी ०८.०० वाजता संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ. मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा, लेंडीबागेतील श्री साईबाबा समाधी शताब्दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे पूजन व द्वारकामाई मंदिरातील गव्‍हाच्‍या पोत्‍याचे पूजन करण्‍यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. मीनाक्षी सालीमठ, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

या मान्यवरांच्या हस्ते जन्मोत्सव साजरा : सकाळी १०.०० वाजता समाधी मंदिराच्‍या उत्‍तर बाजूच्‍या स्‍टेजवर ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्‍मावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ. मालती यार्लगड्डा आणि प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ. कावेरी जाधव यांच्‍या हस्‍ते श्रीराम जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला.

नवीन निशाणांची विधिवत पूजा : यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. दुपारी १२.३० साईंची माध्‍यान्‍ह आरती झाली. माध्‍यान्‍ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्‍या वतीने नवीन निशाणांची वि‍धिवत पूजा करून दुपारी ०४.०० वाजता निशाणांची मिरवणूक काढण्‍यात आली. तर सायं. ०५.०० वाजता साईंच्या रथाची शिर्डी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली.

उत्साहात रथ मिरवणूक : या रथ मिरवणुकीत झांज, लेझीमपथक, बॅण्‍डपथक, ढोलपथके यांच्‍यासह संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं. ०६.३० वा. धुपारती झाली. रात्रौ ०७.१५ ते ०९.१५ यावेळेत मंगेश अमदुरकर, साई म्‍युझिकल ग्रुप, वर्धा यांचा भजनसंध्‍या कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्‍न झाला.

संस्थानच्या वतीने कलाकारांचा सत्कार : संस्‍थानच्‍या वतीने या कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला. रात्रौ ०९.१५ वा. साईंची गुरुवारची नित्‍याची पालखी मिरवणूक काढण्‍यात आली. या पालखी मिरवणुकीत संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. तसेच आज उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍यामुळे मंदिर रात्रभर दर्शनाकरिता खुले ठेवल्‍यामुळे लाखो भाविकांनी साईंचा समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. तर रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत साईबाबा समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम पार पडला.

उदीबरोबर प्रसादरूपी मोफत बुंदी पाकीटे : श्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या दिनांक २२ मार्च २०२३ रोजीच्‍या सभेत पूर्वीप्रमाणेच प्रत्‍येक साईभक्‍तास उदीबरोबर प्रसादरूपी मोफत बुंदी पाकीटे वाटप सुरू करणेबाबत निर्णय घेण्‍यात आला. त्‍यानुसार श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या शुभमुहूर्तावर पूर्वीप्रमाणे दर्शन रांगेतील प्रत्‍येक साईभक्‍तास मोफत बुंदी प्रसाद पाकीट वितरण करण्‍याचा शुभारंभ संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ. मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

साईंच्या समाधीचे दर्शन : यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, सौ. मीनाक्षी सालीमठ, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर कर्मचारी उपस्थित होते. आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी महाराष्‍ट्र राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साईंच्या समाधीचे दर्शन घेऊन विविध धार्मिक कार्यक्रमांमध्‍ये सहभाग घेतला.

आकर्षक विद्युत रोषणाई : उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्‍त श्रीमती शोभा पै यांच्‍या देणगीतून करण्‍यात आलेल्‍या फुलांच्‍या आकर्षक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तर व्‍दारकामाई मंडळ, मुंबई यांच्‍या वतीने मंदिर प्रवेशव्‍दारावर, लेंडीबाग व श्री साईप्रसादालयाच्‍या प्रवेशव्‍दारावर उभारण्‍यात आलेल्‍या भव्‍य देखावे व आकर्षक विद्युत रोषणाई या उत्‍सावाचे विशेष आकर्षण ठरले.

हेही वाचा : Uddhav Thackeray On CM : धनुष्यबाण चोरला, तरी ब्रह्मास्त्र माझ्यासोबत; उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.