अहमदनगर - पुणतांब्यात १जून २०१७ ला झालेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाला आज १ जूनला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यामुळे अकोले येथील किसान सभेच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, युवक आणि महिलांच्या अनेक प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संपाचा दूसरा वर्धापन दिन किसना सभेने मोर्चा काढून साजरा केला.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ व्हावी, शेतीमालाला दीडपट भाव मिळावा, ग्रामीण भागात मागेल त्याला रोजगार हमीचे काम मिळावे, सर्व बेघरांना घरकुल मिळावे, घरकुलांच्या ‘ड’ यादीत सर्व वंचितांचा समावेश व्हावा, बांधकाम कामगारांची प्रलंबित प्रकरणे मंजूर करावीत, वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, वन जमिनीवरून आदिवासींना हुसकावून लावण्याचे कारस्थान बंद करावे, आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा. आदी मागन्या यावेळी निवेदना व्दारे करण्यात आल्या.
यावेळी डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, ज्ञानेश्वर काकड,सारंगधर तनपुरे, नंदू गवांदे, जुबेदा मणियार, आराधना बो-हाडे, पांडुरंग भांगरे, राजू गंभिरे, शिवराम लहामटे, दामू भांगरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.