ETV Bharat / state

MNS Vandalise Toll Plaza : टोलनाका फोडण्याच्या सूचना राज ठाकरेंच्या मुलाने दिल्या नसतील- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील - टोलनाका फोडण्याच्या सूचना

टोलनाका फोडण्याच्या सूचना राज ठाकरेंच्या मुलाने दिल्या नसतील; मात्र सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. टोल वसूली करणे हे तेथील कर्मचाऱ्यांचे कामच आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिरेक थांबविला पाहिजे, असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jul 23, 2023, 9:27 PM IST

सिन्नरमधील टोलनाका फोडण्याच्या घटनेवर महसूल मंत्र्यांची प्रतिक्रिया

अहमदनगर: चारचाकी वाहनातून कोण चाललयं, ताफा मंत्र्यांचा आहे की अधिकाऱ्याचा ही बाब टोलटॅक्स कर्मचाऱ्यांना माहिती नसते. राजकीय पक्ष कुठलाही असो, त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिरेकपणा थांबवला पाहीजे, असे वाटते. त्यातून शेवटी आपल्याच पक्षाची बदनामी होते. पक्ष नेत्रुत्वानेसुध्दा अश्या कार्यकर्त्यांना समज देणे गरजेचे असल्याे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहे.

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत: नगर, सोलापूर, खान्‍देश या भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस व्‍हावा अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. पहिली पेरणी आता वाया गेली असली तरी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारचे नियोजन असल्‍याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. बोगस बियाणे तसेच खतांच्या लिंकेज बाबत येणाऱ्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन यामध्‍ये आता प्रचलित कायद्यात बदल करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कृषीमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली यासाठी समितीही नेमण्‍यात आल्‍याचे विखे पाटील म्हणाले आहेत.

इर्शाळवाडी येथील घटना दुर्दैवी: इर्शाळवाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी असून या आपत्तीमधील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. या संकटात पशुधन दगावलेल्‍या पशुपालकांनाही मदत करण्‍याबाबत शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सरकार पशुपालकांच्‍या पाठीशी: पशुसंवर्धन विभागाच्‍या आधिकाऱ्यांना याबाबत सर्वतोपरी सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. या आपत्तीमध्‍ये दगावलेल्‍या जनावरांची संख्‍या समोर आल्‍यानंतर या पशुपालकांना कोणत्‍या प्रकारची मदत करता येईल याचा विचार शासन निश्चितपणे करेल. लम्पी संकटात केलेल्‍या मदतीप्रमाणेच या नैसर्गिक संकटातही सरकार पशुपालकांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्‍याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

त्यामुळे निर्णय प्रक्रियेला गती: उपमुख्‍यमंत्री म्‍हणून अजित पवार सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍याने सरकारच्‍या निर्णय प्रक्रियेला अधिक गती प्राप्‍त झाली आहे. मागील अडीच वर्षांत ठप्‍प झालेली विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाण्‍यास मदतच झाली आहे. आमचा संसार आता उत्तम चालला असल्‍याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाच्‍या उत्तरात केली.

हेही वाचा:

  1. Amit Thackeray : साहेबांमुळे 65 टोलनाके बंद, आता माझ्यामुळे एक बंद'
  2. Chandrapur News : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे समर्थक आमनेसामने
  3. Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.