ETV Bharat / state

Shirdi Saibaba Sansthan: शिर्डी संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहुल जाधव यांची नियुक्ती

author img

By

Published : Apr 21, 2022, 7:55 PM IST

देशातल्या सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थानच्या ( Shri Saibaba Sansthan Trust ) उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदावर अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई येथील राहुल जाधव ( Rahul Jadhav Deputy CEO Shirdi Sansthan ) यांची नियुक्ती झाली आहे.

Rahul Jadhav
राहुल जाधव

शिर्डी ( अहमदनगर ) : सोनईचे सुपुत्र व सध्या कारंजा जिल्हा अमरावती येथे उपजिल्हाधिकारी ( Amravati Deputy Collector Rahul Jadhav ) म्हणून कार्यरत असलेल्या राहुल दशरथराव जाधव यांची शिर्डी देवस्थानच्या ( Shri Saibaba Sansthan Trust ) उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली ( Rahul Jadhav Deputy CEO Shirdi Sansthan ) आहे.

विविध ठिकाणी कामाचा ठसा : जाधव यांनी याअगोदर आंबेजोगाई व केज ( जि.बीड ) येथे तहसीलदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटावला होता. कोपरगावचे तहसीलदार म्हणून त्यांनी काही वर्षे काम बघितले. येथे त्यांनी वाळूतस्करांच्या विरोधात मोठी आघाडी उघडून अवैध वाळूचोरीचा बिमोड केला होता. नगर व जळगाव येथे त्यांनी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी ( District Supply Officer in charge ) म्हणूनही काम पहिले आहे. मेळघाट व गडचिरोली भागात त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. सोनई येथील स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक दशरथराव जाधव यांचे ते चिरंजीव तर स्वामी समर्थ पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रणजीत जाधव यांचे ते बंधू आहेत.

या नियुक्तीनंतर शिवाजी तरुण मंडळाचे विनायक दरंदले, सुभाष शिरसाठ, व्यंकटेश बेल्हेकर, महावीर चोपडा, यश ग्रुपचे राजेंद्र गुगळे, अनिल दरंदले, सोनईचे सरपंच धनंजय वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : Saibaba Donation Counting: तीन दिवसात साईबाबांना तब्बल 4 कोटीचे दान.. 3 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.