अहमदनगर - जैविक बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहिबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. शंभरहून अधिक देशी बियाणांचे जतन करणाऱ्या राहिबाईंना बीजमाता म्हणून ओळखले जाते. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
नगर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये बीज संरक्षण आणि संवर्धनाचे काम त्या करतात. या पुरस्काराबद्दल त्यांनी समाज आणि शासनाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करताना भविष्यातही आदिवासी भागातील निसर्ग संपत्तीचे जतन आणि संवर्धन करत राहीन, असा विश्वास व्यक्त केला.