ETV Bharat / state

विखे पाटील साई दरबारी, काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंची घेतली भेट

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज अचानक साई दर्शनासाठी शिर्डीत आले. यावेळी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले तसेच काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंचीही भेट घेतली.

विखे पाटील साई समाधीचे दर्शन घेताना
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:42 PM IST

अहमदनगर - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज अचानक साई दर्शनासाठी शिर्डीत आले. मुंबई ते थेट शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई असा त्यांचा रिटर्न प्रवास झाल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिर्डी दौऱ्यावर असताना राधाकृष्ण विखे पाटील

मतदारसंघात असताना विखे नेहमी साई दर्शनासाठी शिर्डीला जातात. मात्र, यावेळी ते साई दर्शनासाठी थेट मुंबईहून शिर्डीला अचानक आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे भाजपवासी झाले. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपने सुजयचे तिकीटही जाहीर केले आहे. सुजयच्या प्रवेशाने काँग्रेसमधील वातावरण तापले आहे. बाळासाहेब थोरात यांनी विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असून, पक्षांतर्गत कलह वाढत चालला आहे. या सर्व घडामोडी बघता विखेंनी नवीन राजकीय निर्णय घेण्यापूर्वी साईंचे आशीर्वाद तर घेतले नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र, याबाबत विखेंनी काहीही बोलण्यास नकार देत मौन बाळगले आहे.

शिर्डीत आल्यानंतर शिर्डी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी विखे यांची भेट घेतली. कांबळे हे विखे समर्थक आहेत. मात्र, सुजयच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्ये वातावरण तापले आहे. कांबळे हे विखे पाटलांच्या भुमिकेमुळे अस्वस्थ आहेत. विखे पाटलांची साथ मिळाली तर निवडणुक सोपी जाईल, असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी विखे यांची भेट घेतली. हॉटेल सन अँड सम येथे बंद खोलीत विखे आणि कांबळे यांची १ तास चर्चा केली. या भेटीनंतरही कांबळेंना अद्याप काही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने ते संभ्रमात आहेत. विखेंनी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला असून ते लवकरच प्रचार सुरू करतील, असा आशावाद कांबळेंनी यावेळी व्यक्त केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अचानक साई दर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावली..मुंबई ते थेट शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई असा त्यांचा रिटर्न प्रवास झाल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांच्या पुढील राजकीय भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....

VO_ मतदार संघात असताना विखे पा.नेहमी साई दर्शनासाठी शिर्डीत जात असतात. मात्र साई दर्शनासाठी थेट मुंबईहून शिर्डीला अचानक जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे भाजपवासी झाले. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपने तिकीट ही जाहीर केल आहे. सुजय च्या प्रवेशाने कांग्रेस मधील वातावरण तापल आहे. बाळासाहेब थोरात यांनी विखे पा.ची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षांतर्गत कलह वाढत आहे. या सर्व घडामोडी बघता विखे पाटलांनी नविन राजकीय निर्णय घेण्यापुर्वी साईंचे आशिर्वाद घेतले का असे विविध प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहेत.याबाबत विखे पा. यांनी बोलण्यास नकार देत सध्या मौन बाळगलय....

VO _ या दरम्यान शिर्डी लोकसभेचे कॉग्रेसचे उमेद्वार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी विखे पा. यांची भेट घेतली...आ.कांबळे हे विखे समर्थक आहेत मात्र सुजयच्या भाजप प्रवेशावरून कॉग्रेस मधे वातावरण तापल आहे. कांबळे हे विखे पाटलांच्या भुमिकेमुळे अस्वस्थ आहेत. विखे पाटलांची साथ मिळाली तर निवडणुक सोपी जाईल अस कांबळे यांना वाटत असल्याने त्यांनी विखे पा.यांची भेट घेतली. हॉटेल सन अँड सम येथे बंद खोलीत विखे आणि कांबळे यांची एक तास चर्चा झाली. भेट झाली असली तरी अद्याप काही ठोस आश्वासन कांबळे यांना मिळाल नसल्याने कांबळे संभ्रमात आहेत. विखे पाटील यांनी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला असुन ते लवकरच प्रचार सुरू होईल असा आशावाद आ. कांबळे यांनी व्यक्त केला आहे....

BITE_ भाऊसाहेब कांबळे , कॉग्रेस उमेद्वारBody:22 March Shirdi VIKHE SHIRDI VISIT Conclusion:22 March Shirdi VIKHE SHIRDI VISIT
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.