शिर्डी ( अहमदनगर ) - राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर यावरुन श्रेयवादाची लढाई पाहालया मिळत आहे. यावरुन भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक होता. महाविकास आघाडीच्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय लांबला होता, अशी टीका विखे-पाटील यांनी केली ( Radhakrishna Vikhe Patil Criticized Mahavikad Aghadi ) आहे.
ओबासी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना लाडू भरवत आनंद उत्सव साजरा केला. तेव्हा विखे-पाटील बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकार मधील नेत्यांच्या कथनी आणि करणीमध्ये होता. महाविकास आघाडीच्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसी आरक्षणाच विषय लांबला होता. ओबासी आरक्षणाच श्रेय घेवू पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे वेळ घालवला.
'महाविकास आघाडीला मोठी चपराक' - सरकारच अपयश झाकण्यासाठी प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवत वेळ वाया घालवला. इम्पिरिकल डेटा ही केंद्र सरकारनेच द्यावा यासाठी वेळ घालवला. राज्यात जनतेचं सरकार यावं लागलं त्यानंतर ओबासांना आरक्षण मिळालं. महाविकास आघाडीने ओबासीचं आरक्षण घालविण्याच जे पाप केल होत, त्यांना ही मोठी चपराक आहे, असे टीकास्त्र विखे-पाटलांनी सोडलं आहे.
'मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज्य चालवण्यास सक्षम' - राज्यात पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालं नाही. त्यावरुन विरोधकांनी शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. 'राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करत विकास कामे सुरु केली आहे. राज्य चालविण्यास ते सक्षम आहेत. त्यामुळे विरोधकांनी आमची चिंता करण्याची गरज नाही. योग्य वेळी मंत्री मंडळाचा विस्तार होईल,' असं स्पष्टीकरणं विखे-पाटलांनी दिलं आहे. मुळे विरोधकांनी आमची चिंता करण्याची गरज नाही योग्य वेळी मंत्री मंडळाचा विस्तार होईल अस विखे पाटलांनी म्हटलय.