शिर्डी (अहमदगर) - सत्तेसाठी काँग्रेस लाचार झाली आहे. महाविकास आघाडी सरकारचा कुठलाही किमान-समान कार्यक्रम नाही. केवळ सत्तावाटपाचा कार्यक्रम सुरू असल्याचा सणसणीत टोला, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर लगावला आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे. सोनिया गांधीच्या पत्रामुळे हे स्पष्ट झाले आहे. सत्तेसाठी किती लाचारी स्विकारावी, हे स्थानिक नेतृत्त्वाने दाखवल्याचे उत्तम उदाहरण असल्याची खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतून होणार महाविकास आघाडीचा भंडाफोड
ग्रामपंचायत निवडणुकीत या सरकारचा भांडाफोड होणार आहे. पक्षीय स्तरावर या निवडणुका होत नसल्या, तरी गावपातळीवर कार्यकर्ते या निवडणूकीत सक्रीयतेने सहभागी होतील. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून न मिळालेली मदत आणि कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेचे झालेले हाल लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील प्रतिक्रिया या निवडणुकीतून राज्यात व्यक्त होईल, असे विखे पाटील म्हणाले.
सोनिया गांधींचे पत्र म्हणजे केवळ संवाद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधींचे पत्र म्हणजे केवळ संवाद आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान-समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सामान्य माणूस महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकार जास्त लक्ष देत आहे, असे थोरात यांनी सांगितले. सोनिया गांधींचा यासाठी सातत्याने संवाद सुरू आहे. यासाठी आता त्यांनी पत्र लिहिले आहे. यात काँग्रेसमध्ये कोणतीही नाराज नाही, असेही थोरातांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - आमदार निलेश लंकेच्या बिनविरोध ग्रांमपंचायत निवडणूक संकल्पनेला अण्णांचा पाठिंबा
हेही वाचा - ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् आमदार निधीचे पंचवीस लाख मिळवा..!!