शिर्डी (अहमदनगर) - महाराष्ट्रमधील शिंदे - फडवणीस सरकार यांच्या मंत्रिमंडळाचा झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नऊ आणि भारतीय जनता पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभावनावर झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा पार पडलाय. भारतीय जनता पार्टीकडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतली. त्यानंतर विखे समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केलाय. शिर्डीत भाजपा कार्यकर्त्यांनी नगरपंचायत समोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय. यावेळी भाजपाचे राहाता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उनगराध्यक्ष अध्यक्ष सुजित गोंदकर सचिन शिंदे ,भाजपा युवा मोर्चाचे सचिन तांबे आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटलांना स्थान - राहाता तालुकाचे लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटलांना जनतेच सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळात राधाकृष्ण विखे पाटलांना स्थान देण्यात आले आहे. आता पर्यंत विखे पाटलांनी चार वेळा मंत्रीपदाची संधी मिळाली. आता पर्यंत त्यांनी अनेक खात्यात मंत्री पद भुषविलय या मंत्री मंडळातही त्यांना महत्वाच खाते मिळेल असा विश्वास शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकरांनी व्यक्त केलाय. शिर्डी बरोबरीने तालुक्यातील विविध गावात विखे पाटलांना मंत्रीपद मिळाल्याने जल्लोष साजरा करण्यत आलाय.
भाजपची ताकद वाढली - विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पराभव केला. राम शिंदे यांना विधानपरिषदेत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढवावी, अशी मागणी भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून होत होती. अखेर राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. ते आमदार होताच राज्यात सत्ता आली म्हणून त्यांचा पायगुण चांगला आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान समर्थक मानले जातात. ते ही मंत्री होतील असेही यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष सचिन तांबे म्हणाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय.