शिर्डी (अहमदनगर) - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून कोरोना संकटात राज्यभर राबवल्या जात असलेल्या यलगार कोविड- 19 या अभियानांतर्गत राज्यभरातील अनेक खासगी हॉस्पिटलमधून होणारी कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट थांबली आहे. युवक काँग्रेसच्या या अभियानामुळे अनेकांचे बिल कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.
कोरोनाचे हे संकट मानवावरील मोठे संकट आहे. यामध्ये आपण कृतिशीलतेने पुढे येत नागरिकांना मदत करावी यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. यामुळे राज्यात असलेल्या रक्ताचा तुटवडा कमी होण्यास मदत झाली. याचबरोबर मागील काही दिवसांपासून राज्यातील काही खासगी रुग्णालयांमधून कोरोना रुग्णांची विविध फॅसिलिटीज व सुविधांच्या नावावर मोठी आर्थिक लूट होत होती. यावर महाविकास आघाडी सरकारने मोठे निर्बंध घातले आहेत. तरीही काही खासगी डॉक्टर त्याकडे दुर्लक्ष करत रुग्णांकडून आर्थिक लूट करत होते. याकडे सत्यजित तांबे यांनी लक्ष वेधले असून युवक काँग्रेसचे यल्गार covid-19 अभियान राज्यभर सुरू केले.
याचा लाभ राज्यातील अनेक नागरिकांना झाला असून ज्या-ज्या खासगी हॉस्पिटलमधून अधिक बिल घेतले जाते. त्या-त्या विभागातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रत्यक्ष तेथे जाऊन त्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना याबाबत अधिकृत विचारणा करत आहेत व याबाबत काही गैरव्यवहार आढळला तर तातडीने बिल कमी करण्यासाठी सूचना करत आहेत. नुकतेच मीरा-भाईंदरमध्ये एका वृद्ध महिलेचे मोठे बिल झाले असताना तेथील कार्यकर्ते दीपक काकडे, गणेश नाईक, कुणाल काटकर यांच्या तत्परतेमुळे मोठे बिल कमी झाले असल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी सत्यजित तांबे यासह युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
युवक काँग्रेसच्या पुढाकारामुळे राज्यभरातील अनेक खासगी रुग्णालयात बिल कमी.. रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून कोरोना संकटात राज्यभर राबवल्या जात असलेल्या यलगार कोविड- 19 या अभियानांतर्गत राज्यभरातील अनेक खासगी हॉस्पिटलमधून होणारी कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट थांबली आहे.