अहमदनगर- देशात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या केंद्रीय वने आणि पर्यावरण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श ग्रामचे सरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून यापूर्वी समितीवर दिवंगत मोहन धारीज, दिवंगत माधव गाडगीळ यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर अनेक वर्षांच्या खंडानंतर पोपटराव पवार यांची या केंद्रीय समितीवर महाराष्ट्रातील व्यक्तीची निवड झाली आहे.
याबाबत बोलताना पवार यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानताना महाराष्ट्रातील जैवविविधता आणि पर्यावरन तसेच आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामाच्या अनुभवावर वनव्यवस्थापन आणि पर्यावरण बदलामुळे होत असलेल्या दुष्परिणामावर चांगले काम करू असा विश्वास व्यक्त केला आहे.
समिती करते वने-पर्यावरणावर काम-
या केंद्रीय समितीचे काम म्हणजे वनव्यवस्थापन करणे, त्याचबरोबर पर्यावरणातील होत असलेल्या बदलांमुळे जे दुष्परिणाम होत आहे त्यावर उपाययोजना शोधणे या पद्धतीने काम करण्याचा या समितीचा उद्देश आहे. देशांमध्ये विविध भागांमध्ये अनेक राज्यांमध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात असून अनेक मोठ्या क्षेत्रांमध्ये वने आहेत. त्यामुळे या वनांचे संरक्षण करणे त्याचे व्यवस्थापन करणे त्याचबरोबर वनांची होणारी कत्तल थांबून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे याकामी वेगवेगळ्या उपाययोजना यावर समिती काम करत असते.
समितीवर निवडीबद्दल पवार यांना समाधान-
याबाबत बोलताना पोपटराव पवार यांनी सांगितले की, गेल्या शंभर वर्षांत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगल तोड झालेली आहे. यामधून जैवविविधतेचा मोठे नुकसान झाले असून त्याचे दुष्परिणाम आपण हवामान बदलात पहात आहोत आणि त्यामुळेच कधी अतिवृष्टी, सुनामी, दुष्काळ यासारखे संकट मानवी जीवनावर अचानकपणे येत आहेत. यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आपली जैवविविधता कायम ठेवत वनांचे संरक्षण करणं हे महत्त्वाचा आहे आणि या समितीचं तेच काम असल्याने आपल्या आवडत्या विषयांमध्ये काम करण्यास मिळणार असल्यामुळे आपल्याला समाधान नसल्याचे पवार यांनी सांगितले.
आपल्या अनुभवपणास लावून काम करू-
वने आणि पर्यावरण समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तर राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे आहेत. त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार या समिती मध्ये आहेत. महत्त्वाचे म्हणजे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या अशाकीय व्यक्तींना या समितीवर घेतले जात असते. आपल्या तीस ते बत्तीस वर्षाचा ग्रामीण भागातील कामाचा अनुभव आपण या समितीवर काम करताना पणास लावू आणि देशाच्या वने संरक्षण व्यवस्थापन आणि पर्यावरण बदलासंबंधी कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत, असे पवार यांनी सांगितलं
मोहन धारिया, गाडगीळ यांच्या नंतर पोपटरावांना संधी-
वने आणि पर्यावरण समितीवर यापूर्वी माजी केंद्रिय वनराईद्वारे पर्यावरणाचे काम सर्वत्र पोहोचवणारे पद्वविभूषण मोहन धारिया त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर अनेक वर्षानंतर पोपटराव पवार यांच्या निमित्ताने महाराष्ट्राला या समितीवर काम करण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्र मध्ये विविध भागात जैवविविधता मुबलक प्रमाणात आहेत त्याचबरोबर आदिवासी भागांमध्ये वने समृद्ध आहेत या सर्वांच्या अनुभवाच्या पाठीवर देशपातळीवर काम करणार असल्याचं पोपटराव पवार यांनी सांगितलं.
हिवरेबाजारला गावासाठी कौटुंबिक लॉकडाऊन-
मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर तो कुठेच कमी होत असतानाच पुन्हा एकदा कोरणा ने डोके वर काढले आहे. मात्र आम्ही गेल्या वर्षी कोरोना लॉकडाउनच्या काळामध्ये जो पर्यावरणीय बदल अनुभवला तो खूप आनंददायक होता. यामुळे लॉकडाउनच्या काळात पर्यावरण खूप छान पद्धतीने दिसून आले. त्यामुळे आम्ही मागील वर्षीच दरवर्षी किमान उन्हाळ्यामध्ये दहा दिवस हिवरे बाजार हे गाव लॉकडाऊन ठेवणार असल्याचं घोषित केलेला आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचं संरक्षण होत असताना कुटुंब सुद्धा आनंदी वातावरणात राहणार आहे. त्याचे नियोजन आम्ही केलेला आहे, मात्र आता कोरोना परत वाढत असल्याने हा लॉकडाउन मार्चमध्ये नाईलाजास्तव घ्यायचा कि मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दहा दिवसांचा घ्यायचा हे लवकरच आम्ही ठरवणार ठरवणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत पुन्हा छापेमारी, चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र