अहमदनगर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साई मंदिरात रोजच लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिर्डी साई मंदिर परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. त्याचबरोबर अनेक भाविक दररोज साईचरणी दान करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर परिसरात पॉलिश एजंटचा सुळसुळाट झालेला आहे. अनेक साईभक्तांना पॉलिश एजंट हजारो रुपयांना लुबाडत असतात. एका पॉलिश एजंटने थेट पी. शिवशंकर यांनाच व्हीआयपी दर्शनाची ऑफर दिली. पी. शिवशंकर यांनी ती ऑफर धुडकावून साई संस्थानमध्ये कोणालाही सूचना न देता थेट सामन्य भक्ता प्रमाणे रांगेतून दर्शन घेतले. खुद्द शंकर यांनी माध्यमांशी बोलताना हा अनुभव सांगितला.
साईबाबा संस्थानच्या अधिकारी पदी नियुक्ती : गेल्या अनेक दिवसांपासून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद प्रभारी अधिकाऱ्याकडे होते. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार पी. शिवशंकर यांची साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पी. शिवशंकर यांनी आज गुरुवारी साई संस्थानचा पदभार स्वीकारला. त्यांनंतर त्यांनी मंदीर परीसरात पाहणी करत माहिती करुन घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सामान्य दर्शन रांगेतून घेतले दर्शन: यावेळी पत्रकारांशी बोलताना पी. शिवशंकर म्हणाले की, मी आज सामन्य भक्तांना दर्शन घेतांना काय अडचणी येतात. हे पाहण्यासाठी सामान्य दर्शन रांगेतून साई दर्शनाला गेलो. मात्र 3 तास दर्शन रांगेत थांबताना अनेक अनुभव आले. भक्तांना काय अडचणी येतात हे समजले. त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणा राज्यातील अनंतपुरम जिल्ह्यातील जनार्धन पल्ली येथील पी. शिवशंकर रहिवासी आहेत. तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साई संस्थानच्या नवीन सीईओ म्हणून पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद प्रभारी अधिकाऱ्याकडे होते. आज गुरुवारी पी. शिवशंकर साई संस्थानचा पदभार स्वीकारला आहे.