ETV Bharat / state

ग्रामपंचायत शिपायाला मारहाण; राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल

अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांना मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police register FIR against ncp mla dr kiran lahamate for beating gram panchayat employee
ग्रामपंचायत शिपायाला मारहाण; राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 19, 2020, 10:55 AM IST

अहमदनगर - अकोले विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार राजूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

सीताराम भांगरे बोलताना...
याबाबत माहिती अशी की, गुरूवार (१७ सप्टेंबर) रोजी तक्रारदार रामदास लखा बांडे हे दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावातील दत्त मंदिराजवळ पायी जात असताना मागून आमदार डॉ . किरण लहामटे यांची गाडी जोरात येऊन कट मारून गेली. त्या वेळी मला वाटले पर्यटक आहेत म्हणून गाडी हळू चालवा, असे ओरडून सांगितले. त्या गोष्टीचा राग येऊन आमदार गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरले आणि म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे असे म्हणून त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथ मारून मला शिवीगाळ केली व गाडीत बसून निघून गेले म्हणून त्याचे विरोधात कायदेशीर फिर्याद राजुर पोलीस ठाण्यात दिली आहे.
Police register FIR against ncp mla dr kiran lahamate for beating gram panchayat employee
एफआईआर कॉपी...

या वेळी तक्रारदारासोबत मनोहर सखाराम भांगरे होते. राजूर पोलिसांनी त्याची तक्रार घेतली असून अदखलपात्र गुन्हा रजि. क्रमांक १२८३/२० भादंवि ५०४. ५०६ दाखल केला आहे. या घटनेचे पडसाद उमटले असून भाजपाचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी या घटनेचा निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा - कांद्यासाठी धावून येणारे मागील सहा महिने कुठे होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रश्न

हेही वाचा - दुर्दैवी..! मळणी यंत्रात अडकून विवाहित तरुणीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.