ETV Bharat / state

लग्न समारंभ, हॉटेल्स, अंत्यविधी, दशक्रियाविधींवर पोलिसांची करडी नजर; कारवाई सुरू

नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस पथकांनी लग्न समारंभ आणि हॉटेल्स, अंत्यविधी, दशक्रियाविधी निशाण्यावर घेतले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

ahmednagar police
कारवाई करताना पोलीस
author img

By

Published : Mar 9, 2021, 2:59 PM IST

Updated : Mar 9, 2021, 3:14 PM IST

अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असतानाच नगर जिल्ह्यातील परिस्थितीही वाढत्या रुग्णसंख्येने आता चिंताजनक बनली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस पथकांनी लग्न समारंभ आणि हॉटेल्स, अंत्यविधी, दशक्रियाविधी निशाण्यावर घेतले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

कारवाई करताना पोलीस

हेही वाचा - बीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पोलीस पथक थेट लग्न मंडपात, दशक्रियाविधी सुरू असताना कारवाई-

-जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनानियमांच्या कडक अमलबाजवणीचा आदेश जारी करताच आज मंगळवार पासून शहरातील विविध पोलीस ठाण्यांची पथके आपल्या भागातील मंगल कार्यालये, हॉटेल्स, अंतविधी, दशक्रियाविधी आदी ठिकाणी जात किती उपस्थिती आहे, सोशल डिस्टन्स पाळला जातो का, मास्क वापरतात का याची पाहणी करत त्याचे व्हिडीओ शूटिंग घेत आहेत. ज्या ठिकाणी नियमांची अमलबाजवणी होत नसेल तर अशा ठिकाणी गुन्हे दाखल करून दंड करण्याचे आदेश आहेत. नगर जिल्ह्यात या कारवाईला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. एका ठिकाणी दशक्रियाविधी सुरू असताना नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्याने पोलिसांनी दहा हजार रुपयांचा दंड केला.

हॉटेल-रेस्टॉरंटवर टाकणार छापे-

नगर शहर आणि तालुक्यांच्या शहरातील हॉटेल्स-रेस्टवारंट पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने आता पोलीस हे याठिकाणी अचानक छापे टाकून दंड आकारून गुन्हे दाखल करणार आहेत. नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमांचे पालन करत काळजी घ्यावी अन्यथा पोलीस-प्रशासन कडक कारवाई करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शाळांबाबत येत्या तीन दिवसांत निर्णय-

जिल्हयातील शाळा सुरू ठेवण्याबाबत निर्णय येत्या तीन दिवसांत घेतला जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती यावर शाळांतील कोरोनाची परिस्थितीची माहिती घेऊन शाळा सुरू ठेवणे अथवा बंद ठेवणे याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय घोषित होईल.

हेही वाचा - 'यांची कोरोनासोबत बैठक झालीय का?'

Last Updated : Mar 9, 2021, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.