ETV Bharat / state

श्रीगोंद्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 7 यांत्रिक बोटी स्फोटाने उडवल्या - sand extraction boats

जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी सध्या अवैध वाळू तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या भागात नदीपात्रामध्ये वाळू तस्कर अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

बोटी स्फोटाने उडवल्या
author img

By

Published : Jul 18, 2019, 9:56 AM IST

अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी पात्रात अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली. नदीतील ७ यांत्रिक बोटी महसूल आणि गुन्हे अन्वेषण शाखेने जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करुन नष्ट केल्या. या बोटींची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या 7 यांत्रिक बोटी स्फोटाने उडवल्या

जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी सध्या अवैध वाळू तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या भागात नदीपात्रामध्ये वाळू तस्कर अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह महसूल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे तस्कर आणि कामगार यांनी तिथून पळ काढला.

पोलिसांनी या सर्व यांत्रिक बोटी जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवत जागेवरच नष्ट केल्या. यामध्ये दोन लोखंडी तर पाच फायबरच्या यांत्रिक बोटी आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, विजय वेठेकर, रवींद्र कर्डिले, राहुल सोळुंके, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पायसर यांच्यासह तलाठी रुपेश भावसार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:अहमदनगर- अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात यांत्रिक बोटी महसूल-पोलीस पथकाने केल्या नष्ट..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_sand_action_pkg_7204297

अहमदनगर- अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात यांत्रिक बोटी महसूल-पोलीस पथकाने केल्या नष्ट..

अहमदनगर- जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी पात्रात अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या सात यांत्रिक बोटी महसूल आणि गुन्हे अन्वेषण शाखेने जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट करत नष्ट केल्या आहेत. या बोटींची किंमत 35 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी सध्या अवैध वाळू तस्करां विरोधात जोरदार मोहीम उघडली असून गुरुवारी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या भागात नदीपात्रामध्ये वाळू तस्कर अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी महाजन यांच्यासह महसूल आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे तस्कर आणि कामगार यांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी या सर्व यांत्रिक बोटी जिलेटिन च्या साह्याने स्फोट घडवत जागेवरच नष्ट केल्या. यामध्ये दोन लोखंडी तर पाच फायबरच्या यांत्रिक बोटी आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक फौजदार सोन्याबापु नाणेकर, विजय वेठेकर, रवींद्र कर्डिले, राहुल सोळुंके, ज्ञानेश्वर शिंदे,कमलेश पायसर यांच्यासह तलाठी रुपेश भावसार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात यांत्रिक बोटी महसूल-पोलीस पथकाने केल्या नष्ट..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.