ETV Bharat / state

हातात तलवारी घेऊन दहशत पसरविणाऱ्याला बेड्या - शाहरुख शेखला पोलिसांकडून अटक

श्रीरामपूर शहरातील साईनगर येथे दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन दहशत निर्माण करणार्‍या शाहरुख शेखला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातात तलवारी घेऊन दहशत पसरविणाऱ्याला बेड्या

author img

By

Published : May 15, 2021, 6:08 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील साईनगर येथे दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख शेख असे या तरुणांचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील साईनगर येथील कच्च्या रोडने एक व्यक्ती दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे, अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांचे पथक साईनगर येथे गेले असता समोरून एक व्यक्ती दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला. पोलीस त्याच्या दिशेने गेले असता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने शाहरुख अन्वर शेख (वय 21 रा. शनी चौक, वॉर्ड 2, श्रीरामपूर) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचासमोर त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या दोन लोखंडी तलवारी आढळल्या. त्यांची एकूण किंमत 1 हजार 100 असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गुन्हा दाखल

पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा - 'तौक्ते’ चक्रीवादळ गोवा-सिंधुदुर्गच्या दिशेने; गोव्यात एनडीआरएफ दाखल; मुंबईत वाऱ्यासह पाऊस

हेही वाचा - राजा तुपाशी, प्रजा उपाशी... भेंडवळच्या घटमांडणीचे वर्तविले भाकित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.