ETV Bharat / state

शिर्डीत 'मॉर्निग वॉक'ला गर्दी करणाऱ्यांना प्रशासनाने ठोठावला दंड, 10 महिलांसह 70 जणांवर कारवाई

सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या 70 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात 10 महिलांचाही समावेश आहे. 20 जणांना शिर्डी पोलिसांनी प्रत्येकी 200 रुपये दंड केला, तर शिर्डी नगरपंचायतीने 35 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला.

author img

By

Published : Apr 24, 2020, 2:51 PM IST

शिर्डी
शिर्डी

शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा तहसीलदारांनी करताच, लोकांना कोरोना कायमचा गेल्याप्रमाणे वाटले. परिणामी दुसर्‍याच दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. शिर्डीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या 10 महिलांसह 70 जणांवर कारवाई करण्यात आली. सर्वांना शिक्षा म्हणून शारीरिक कवायत करणे भाग पाडण्यात आले. तसेच दंडात्मक कारवाईही करण्यात आली, तर विनाकारण फिरणार्‍या दहा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलून 30 हजार रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय दीड तास शारीरिक कवायत करायला लावून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, शिर्डी पोलीस कर्मचारी, नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून गुरुवारी सकाळी सहा वाजता द्वारावती सर्कल या ठिकाणी बंदोबस्त लावला.

यावेळी सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या 70 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात 10 महिलांचाही समावेश आहे. 20 जणांना शिर्डी पोलिसांनी प्रत्येकी 200 रुपये दंड केला, तर शिर्डी नागरपंचायतीच्यावतीने 35 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.