ETV Bharat / state

PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी साईचरणी लीन; निळवंडे धरणाचंही केलं लोकार्पण - शिर्डी शेतकरी मेळावा

PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं भाविकांच्या सुविधेसाठी उभारलेल्या 110 कोटी रुपयांचे नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुलाचं लोकार्पण आज (26 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच त्यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडत जलपूजनही केलं.

PM Narendra Modi Shirdi Visit
पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 7:49 AM IST

Updated : Oct 26, 2023, 8:17 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचे लोकार्पण

अहमदनगर (शिर्डी) PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यांनी साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल बैस देखील उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी निळवंडे धरणातून पाणी सोडत जलपुजन केलं. एसी दर्शन रांग, शैक्षणिक संकुल, निळवंडे प्रकल्प आदी कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या सोबतच मोदींच्या उपस्थितीत येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

निळवंडे धरणाचं लोकार्पण : निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून डाव्या कालव्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी दुपारी झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे आदी नेते उपस्थित होते.

  • श्री साईबाबा समाधी मंदिरात प्रार्थना केली. भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले. pic.twitter.com/5FXjD1t4Ds

    — Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थाननं १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (26 ऑक्टोबर) या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

ही आहेत दर्शनरांगेचे वैशिष्ट्ये : दर्शनरांग प्रकल्पाचं बांधकाम क्षेत्रफळ २ लाख ६१ हजार ९२० चौरस फूट आहे. घडीव दगडाची वातानुकुलीन दर्शन रांग, प्रवेशासाठी ३ भव्य प्रवेशद्वार, एकाचवेळी सुमारे ४५ हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, ४८ बायोमेट्रिक पास काऊंटर, २० लाडू प्रसाद काउंटर, २ विभूती काऊंटर, २ साईंचे कापड कोठी काऊंटर, २ बुक स्टॉल्स, १० देणगी कांऊटर, ०६ चहा, कॉफी काउंटर व बँग स्कँनर, २५ सेक्युरिटी चेकअप सेंटर, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी १० हजार क्षमतेचे १२ वातानुकूलीत हॉल, आरओ प्रक्रियेचे शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र अशी या दर्शनरांगेची वैशिष्ट्ये आहेत.

  • #WATCH | PM Modi offers prayers at Shri Saibaba Samadhi Temple in Maharashtra's Shirdi

    Maharashtra Governor Ramesh Bais, CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis are also present pic.twitter.com/khMOQhNtjc

    — ANI (@ANI) October 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निळवंडे धरण प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८ हजार ८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या धरणाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मोदींनी या धरणावर जाऊन जलपूजन केलं व धरणातून पाणी सोडण्यात आलं.

या कामांचं झालं लोकार्पण : अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचं उद्घाटन, महिला व बाल रूग्णालयाचं भूमिपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मीनल बिल्डिंगचं भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं. तसंच कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचं विद्युतीकरण (१८६ किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६ किमी), एनएच-१६६ (पॅकेज-१) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. Narendra Modi : आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक, २०३६ ऑलिम्पिकसाठी दावा ठोकणार - पंतप्रधान मोदी
  2. Ayodhya Ram Mandir : 'या' तारखेला होणार राम मंदिराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींनी निमंत्रण स्वीकारलं
  3. PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेणार; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Last Updated : Oct 26, 2023, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.