राहाता (अहमदनगर) - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज राहाता तहसील कार्यालय, राहता पंचायत समिती व साई योग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील आवारात वड, कडूनिंब, पिंपळ या देशी झाडांचे वृक्षारोपण तहसीलदार कुंदन हिरे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्याहस्ते करण्यात आले.
![तहसील कार्यालय आवारात वृक्षारोपण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-plantationinthetehsilofficepremisesontheoccasionofworldenvironmentday-5-photo-mh10010_05062021203055_0506f_1622905255_530.jpg)
ऑक्सिजन वायूचे महत्व विशद
याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे यांनी ऑक्सिजन वायूचे महत्व विशद केले तसेच त्यासाठी प्राणवायूपूरक झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धन करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी पुरवठा अधिकारी योगेश पालवे, कृषी विस्तार अधिकारी प्रवीण चोपडे, संदीप मेहेरखंब, भाऊसाहेब बनसोडे, बाबासाहेब शिंदे तसेच साई योग फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, राजू वाईकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे व राजेंद्र फंड उपस्थित होते. शेवटी राजेंद्र फंड यांनी फाउंडेशनतर्फे सर्वांचे आभार मानले.
हेही वाचा- डोंबिवलीत आज राष्ट्रीय कन्यादिनी मुलींच्या नावाने वृक्षारोपण