ETV Bharat / state

इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल - औरंगाबाद खंडपीठ बातमी

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करत असताना स्त्रीभ्रूणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात प्रोसेस इशू केली होती. या विरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेश रद्द केले होते. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी अ‌ॅड. जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली.

इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराज
author img

By

Published : May 6, 2021, 5:30 PM IST

अहमदनगर - आपल्या किर्तनातून पूत्रप्राप्तीबाबत केलेल्या विधाना प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल खसलेला खटला या न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रध्दा निर्मुलन समीतीच्या संगमनेर येथील अ‌ॅड. रंजना गवांदे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. इंदुरीकर यांच्या विरोधातील तक्रार रद्द करू नये, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली असून खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी आता आठ आठवड्यानंतर ठेवली आहे.

माहिती देताना याचिकाकर्त्या

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करत असताना स्त्रीभ्रूणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात प्रोसेस इशू केली होती. या विरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेश रद्द केले होते. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी अ‌ॅड. जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. यावर खंडपिठाने मंगळवारी (दि.4मे) इंदुरीकर महाराज व अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे नाटीस काढली आहे.

हेही वाचा - साईसंस्थानचा ऑक्सिजन प्रकल्प दोन दिवसात होणार कार्यान्वित; आरटीपीसीआर लॅबही पुर्णत्वाकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.