ETV Bharat / state

माजी खासदार दिलीप गांधी अनंतात विलीन, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.. - दिलीप गांधी यांच्यावर अंत्यसंस्कार

भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांचा कोरोनामुळे दिल्लीत मृत्यू झाला होता. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी खासदार दिलीप गांधी अनंतात विलीन
माजी खासदार दिलीप गांधी अनंतात विलीन
author img

By

Published : Mar 19, 2021, 7:52 AM IST

Updated : Mar 19, 2021, 8:31 AM IST

अहमदनगर - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी दिल्लीत कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर गुरुवारी अहमदनगरमध्ये अमरधाम येथील विद्युतदाहिणीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

माजी खासदार दिलीप गांधी अनंतात विलीन
माजी खासदार दिलीप गांधी अनंतात विलीन
जिल्ह्याच्या विकासात गांधींचे मोठे योगदान-

दिवंगत नेते दिलीप गांधी यांनी आपल्या संसदीय कारकिर्दीत नगर जिल्ह्याचे प्रश्न हिरीरीने मांडले आणि केंद्राकडून मोठा निधी आणून ते सोडवले. त्यांचे जिल्ह्यातील विकासात मोठे योगदान राहिल्याची भावना खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार पाचपुते यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भावना व्यक्त करताना गांधी यांनी केंद्राच्या अनेक योजनांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यासाठी मदत केल्याचे सांगितले. तर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नितेश लंके यांनी गांधी हे भाजपचे असले तरी निवडणूक वगळता, त्यांनी कधीही पक्षीय राजकारण न करता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केल्याचे सांगितले.

खासदार दिलीप गांधी
दिल्लीत कोरोनामुळे झाले होते निधन-

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवार पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीत निधन झाले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते सत्तर वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुळेझ एक मुलगी असा परिवार आहे.

अहमदनगर दक्षिणचे तीन वेळेला संसदेत केले प्रतिनिधित्व-

दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टीकडून खासदार होते. तर 2003 ते 2004 दरम्यान केंद्रातील भाजप सरकारमध्ये जहाज बांधणी राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला. 1999 लाते प्रथम खासदार झाले. पुढे 2009 आणि 2014 साली ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 ला त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून सुजय विखे यांना उमेदवारी दिली, मात्र दिलीप गांधी यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता पक्षाचे काम अविरत केले.

संघाचे कट्टर स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार आणि मंत्री-

दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते. भारतीय जनता पक्षाच्या विविध शाखात त्यांनी काम केले. नगर पालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष पद, नगर अर्बन बँकेचे अध्यक्षपद आदी पदे त्यांनी भूषवली होती. पुढे दिल्लीत खासदार असताना मतदारसंघाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.

Last Updated : Mar 19, 2021, 8:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.