ETV Bharat / state

अहमदनगर : पाण्याचा व्हॉल्व फुटल्याने विक्रेते-नागरिकांची दिवाळी बाजारात तारांबळ

एकविरा चौकात रविवारी सकाळी ग्राहकांची गर्दी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू केले. हा व्हॉल्व अचानक फुटला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले.

author img

By

Published : Oct 27, 2019, 1:36 PM IST

एकविरा चौकात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने चौकाला तलावाचे स्वरूप

अहमदनगर - सावेडी उपनगरातील एकविरा चौकात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने चौकाला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे या ठिकाणी दिवाळीनिमित्त दुकाने लावलेल्या विक्रेत्यांचे आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा व्हॉल्व फुटल्याची तक्रार नागरिक आणि दुकानदार करत आहेत.

एकविरा चौकात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने चौकाला तलावाचे स्वरूप

हेही वाचा - साई मंदिर परिसरातील 'हा' आकाश कंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र

दिवाळी सणाच्या निमित्त विविध साहित्यांची दुकाने रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या स्वरूपात थाटली जातात. नागरिकसुद्धा या ठिकाणीच खरेदीसाठी गर्दी करत असतात. एकविरा चौकात रविवारी सकाळी ग्राहकांची गर्दी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू केले. हा व्हॉल्व अचानक फुटला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले. या पाण्यामुळे दुकानदारांची आणि ग्राहकांची मोठी अडचण झाली. नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Intro:अहमदनगर- व्हॉल्व फुटल्याने विक्रेते-नागरिकांची ऐन दिवाळी बाजारात तारांबळ..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_water_licage_vis_7204297

अहमदनगर- व्हॉल्व फुटल्याने विक्रेते-नागरिकांची ऐन दिवाळी बाजारात तारांबळ..

अहमदनगर- आज रविवारी ऐन दिवलीच्या दिवशी सावेडी उपनगरातील एकविरा चौकातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याणे या ठिकाणी सणाच्या निमित्ताने थाटलेल्या विक्रेत्यांचे आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळेच हा व्हॉल्व फुटल्याची तक्रार नागरिक आणि दुकानदार करत होते. दीपावलीच्या निमित्ताने विविध साहित्याची दुकाने रस्त्याच्या कडेलाच तात्पुरत्या स्वरूपात थाटली जातात आणि नागरिकसुद्धा या ठिकाणीच खरेदीसाठी गर्दी करत असतात. अशात सावेडी उपनगरातील एकविरा चौकात आज सकाळी मोठी गर्दी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या गर्दीतच व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. यावेळी हा व्हॉल्व अचानक फुटला आणि या व्हॉल्व मधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले. यामुळे रस्त्यावर थाटलेल्या दुकानदारांची आणि ग्राहकांची मोठी अडचण झाली. नागरिकांनी यावेळी पालिका कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- व्हॉल्व फुटल्याने विक्रेते-नागरिकांची ऐन दिवाळी बाजारात तारांबळ..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.