ETV Bharat / state

तुळजाभवानीच्या माहेरात पारंपरिक उत्सव टाळून पालखी पलंग तुळजापूरला होणार रवाना

अहमदनगर जवळील बुऱ्हाणनगर हे तुळजाभवानीचे माहेर म्हणून सर्वश्रुत म्हणून मानले जाते. दरवर्षी नवरात्रीनंतर दसऱ्या दसऱ्याला आई तुळजाभवानीच्या मूर्तीची मिरवणूक पालखी आणि निद्रेसाठीचा पलंग बुऱ्हाणनगर जातो. मात्र, वर्षी कोरोनाचे संकट आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली नसल्याने हे मिरवणूक उत्सव न करता पालखी व पलंग तुळजापूरला रवाना होणार आहे.

पालखी
पालखी
author img

By

Published : Oct 7, 2020, 8:09 PM IST

Updated : Oct 7, 2020, 8:49 PM IST

अहमदनगर - अहमदनगरजवळ असलेले बुऱ्हाणनगर हे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीचे माहेर म्हणून सर्वश्रुत म्हणून मानले जाते. नवरात्रीनंतर दसऱ्याला आई तुळजाभवानीच्या मूर्तीची मिरवणूक पालखी आणि निद्रेसाठीचा पलंग बुऱ्हाणनगर जातो. ही परंपरा हजार वर्षापूर्वीचे असल्याचे मानकरी सांगतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली नसल्याने हे मिरवणूक उत्सव होणार नाही, असे सांगितले जात आहे.

बातचित करताना प्रतिनिधी

बुऱ्हाणनगरमधील भगत कुटुंबात तुळजाभवानी मातेने बालपणीचे 14 वर्षे वास्तव्य केले आहे. म्हणूनच एक मोठा मान कुलस्वामिनीने बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबाला दिला आहे. तुळजापुरात दसऱ्याला तुळजामातेची मूर्ती मंदिराला प्रदक्षिणा घालत पालखीत सीमोल्लंघन करते आणि नंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निद्रिस्त होते. ही पालखी आणि पलंग पाठवण्याचा मान भगत कुटुंबाला आहे.

पालखीचे लाकूड दांडा राहुरीला जातो तिथे मानकरी असलेल्या स्थानिक लोहार आणि सुतार ही पालखी तयार करतात. तर देवीचा पलंग पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे तयार होऊन जुन्नरमार्गे अहमदनगरला येतो. तिसर्‍या माळेला नगर जवळ पालखी आणि पलंगाची भेट भिंगार इथे होते आणि त्याच रात्री पालखी आणि पलंग तुळजापूरकडे स्वतंत्र मार्गाने रवाना होतो. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली नसल्याने हे मिरवणूक उत्सव होणार नाही, असे सांगितले जात आहे.

देशातील अनेक राज्यातील मंदिरे सुरू झाली असली तरी महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. या परिस्थितीत मंदिरे सुरू करा, नियम पाळले जातील, असे मत भक्तांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षाने मंदिरे खुली करावी यासाठी दबाव वाढवला आहे, या परिस्थितीत आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - कृषी कायदा : अहमदनगरमध्ये भाजपाकडून राज्य सरकारचा निषेध, स्थगिती आदेशाची होळी

Last Updated : Oct 7, 2020, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.