ETV Bharat / state

जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव - राहीबाई पोपरे बीजमाता

'बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राहीबाई या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी आहेत. त्या विविध पिकांचे गावरान वाणांचे जतन करण्याचे काम करतात.

padmashri-award-winner-rahibai-popares-inspirational-journey
जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव
author img

By

Published : Jan 26, 2020, 11:37 AM IST

Updated : Jan 26, 2020, 7:13 PM IST

अहमदनगर - 'बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपरे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. आदिवासी कुटुंबातून येणाऱ्या राहीबाई यांनी आतापर्यंत गावरान वाण असलेल्या भात, नागली, वरई, पालेभाज्या, फळे यांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा जतन केला आहे. 'जुनं ते सोनं' असे म्हणत राही मावशींनी संकरित भाज्या खाण्यापेक्षा गावरान भाज्या खाण्याने शरीराला चांगली ताकद मिळत असल्याचे सांगितले आहे.

जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव

हेही वाचा - 'बीजमाता’ राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात झोट्याशा झोपडीत राहिबाई पोपेरे राहतात. अशिक्षित राहीमावशींना सुरुवातीपासूनच जेमतेम दोन ते तीन एकर जमीन आहे. भात आणि वेगवेगळ्या भाज्या हेच पिकवून त्यावर उदरनिर्वाह करतात. भाज्या, फळ आणि विविध प्रकारचे धान्यांचे वाण साठवण्याची राहिमावशींना सुरवातीपासून आवड होती. त्यानुसार त्यांनी खूप धडपड केली. त्या म्हणत, लोकांनी संकरीत असलेला वाण न खाता गावरान वाणाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. असे केल्याने माणूस निरोगी राहत असल्याच विश्वास राहीमावशीच्या मनात साठलेला होता. या विश्वासामुळे आज लोप पावत चाललेल्या अनेक पिकांच्या मुळ वाणांचे जतन राहिमावशीने केले आहे. भात, घेवडा, नागली, वरई, उडीद, वाटाणा, तूर अशी वेगवेगळी पीकं, भाज्यांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा आज राही मावशींच्या बियाण्यांच्य बँकेत आहे. केवळ हायब्रीड पदार्थ खाल्ल्याने आज माणसांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे त्या सांगतात.

संकरीत दिसायला चांगले असलं तरी शरीरासाठी चांगले नाही हे राही मावशी पोटतीडकीने लोकांना सांगतात. त्यामुळे त्यांनी गावरान वाणांचा जतन केलेला ठेवा समाजापर्यंत पोहचायला हवा यासाठी त्या काम करत आहेत. लहानगे निरोगी राहावेत त्यांना सकस अन्न खायला मिळावे या उद्देशाने राहीमावशींनी अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून या पिकांचे वाण सामान्यापर्यंत पोहचवण्याचा ध्यास घेतला आहे. 'बायफ मित्रा' ही सामाजिक संस्थांही यासाठी त्यांची मदत करत आहेत. तसेच राही मावशी यांच्या गावा शेजारील 10 ते 15 गावातील महिला आणि पुरुष राहिमावशीच्या मदतीसाठी पुढे आले आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांनी माठात बियाणे साठवले आहेत. 'बायफ मित्रा' या सामाजिक संस्थेने राहिबाईला हात दिला आणी आता राहिबाईच्या पिकांच्या वाणांसह आदिवासी परीसरातील लोकांकडे असलेल्या अशा 245 प्रकारच्या वाणांची बँक राहीमावशीच्या घरी सुरू झाली आहे. बियाण्यांचा खजिना सर्व सामान्यपर्यंत पोहचावा आणी जनतेला त्याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - घटनात्मक प्रजासत्ताक राष्ट्राची मूल्ये आठवताना...

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका आदिवासी महिलेने जपलेय गावरान पिंकाचे वाण…भात, नागली,वरई वेगवेगळ्या भाज्या , फळे यांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा राहिमावशीने जतन केलाय...जुनं ते सोनं अस म्हणतात आणी ते खरंही आहे...आपण खाण्यासाठी जे चांगल दिसतय ते घेण्यात धन्यता मानतो मात्र त्यापासून आपल्याला सकस काही मिळणार आहे कि नाही याचा विचारही करत नाही... आपण हा विचार करत नसलो तरी संकरीत खाण्यापेक्षा गावरान खाणे शरीरासाठी योग्य...ह्या आवडीतून अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या राहिमावशीने भाजी आणी पिकांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा जतन केलाय....

VO _अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात या झोट्याशा झोपडीत राहिबाई पोपेरे हि अशिक्षित आदिवासी महिला राहते... जेमतेम दोन ती एकर शेती... भात आणि वेगवेगळ्या भाज्या हेच पिकवुन आपली गुजरान करायची...भाज्या , फळे, पिके यांचे वाण साठवण्याची राहिमावशीची सुरवातीपासुन आवड... संकरीत न खाता गावरान खाल्याने माणुस निरोगी राहतो हा विश्वास राहीमावशीच्या मनात साठलेला आहे.... याच विश्वासामुळे आज लोप पावत चाललेल्या अनेक पिकांच्या मुळ वाणांचे जतन राहिमावशीने केले आहे...भात , वाल , नागली , वरई , उडीद , वाटाणा , तूर अशी वेगवेगळी पिकं भाज्या यांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा आज राही मावशीच्या शिदोरीत आहे... आपण जर सकस खाल्ले तर आपले आरोग्य सुद्धा निरोगी राहिल असा विश्वास राहीमावशीला आहे....उत्पन्न जास्त मिळते म्हणून केवळ संकरीत पिकांच्या उत्पादनाने आज माणसांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असल्याच राहीमावशीला वाटतय....

VO _संकरीत दिसायला चांगलं असलं तरी शरीरासाठी नाही हे राहीमावशीला कळलय त्यामुळे तिने गावरान पिकांच्या जतन केलेला ठेवा समाजापर्यंत पोहचायला हवं यासाठी राहीबाई काम करतेय ...महाराष्ट्रातील मुले बाळे निरोगी रहावी त्यांना सकस अन्न खायला मिळावे या उद्देशाने राहीबाईने अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून या पिकांचे वाण सामान्यापर्यंत पोहचवण्याचा ध्यास घेतला आहे ... बायफ मित्रा हि सामाजिक संस्थांही यासाठी राहिबाईची मदत करतेय तसेच राहिमावशी यांच्या गाव शेजारील १० ते १५ गावातील महिला आणि पुरुष हि राहिमावसीच्या माद्द्ती साठी पुढे आले आहे….राहिमावशी अनेक वर्षापासून या गावरान पिकांच्या वाणांचे जतन करते आहे ... आपल्या पारंपरिक पद्धतीने माठात हे बियाणे साठवले गेले.... बायफ मित्रा या सामाजिक संस्थेने राहिबाईला हात दिला आणी आता राहिबाईच्या पिकांच्या वाणांसह आदिवासी परीसरातील लोकांकडे असलेल्या अशा 245 प्रकारच्या वाणांची बॅन्क राहीमावशीच्या घरी सुरू झाली आहे.... राहीबाईचा हा खजिना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचावा आणी जनतेला त्याचा फायदा व्हावा हि अपेक्षा आहे....Body:mh_ahm_shirdi_rahibai popere_26_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_rahibai popere_26_visuals_bite_mh10010
Last Updated : Jan 26, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.