ETV Bharat / state

राहाता ग्रामीण रुग्णालयात एक कोटी ५३ लाख रुपयांच्या ऑक्सिजन प्रकल्पास मंजुरी - ऑक्सिजन प्रकल्प राहाता

कोविड संकटात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भेडसावली होती. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांच्या ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Oxygen project
Oxygen project
author img

By

Published : May 18, 2021, 7:05 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोविड संकटात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भेडसावली होती. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांच्या ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोविडच्या संकटात ऑक्सिजन अभावी अनेक निरापराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ऑक्सिजन बेड अभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली ससेहोलपट ही भयंकर होती. आशा सर्व पार्श्वभूमीवर या परिस्थितीवर कायमस्वरूपी उत्‍तर म्हणून विखे-पाटील यांनी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी करत याचा पाठपुरावा शासनाकडे केला होता.

राहाता तालुक्यात ३ ग्रामीण रुग्णालये, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालय मोठ्या संख्येने आहेत. कोविड संकटाच्या दुसऱ्या संक्रमणात रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. कोविडसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांसह शिर्डी संस्थानच्या व प्रवरा कोविड सेंटरमध्ये बेडची सुविधा उपलब्ध झाली असली तरी सर्वच ठिकाणी ऑक्सिजनच्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याकडे विखे यांनी लक्ष वेधले होते.

शिर्डी येथे संस्थानने प्रकल्प उभारला असला तरी तिथे निर्माण होणारा ऑक्सिजन हा संस्थानच्या रुग्णालयालाच उपयोगी पडेल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व इतर रुग्‍णालयांना पुन्हा ऑक्सिजनची टंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून कायम स्वरूपी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्याची मागणी विखे पाटील यांनी केली होती. विखे पाटीलयांच्‍या मागणीला सकारात्‍मक प्रतिसाद देवून प्रशासनाने ग्रामीण रुग्‍णालय राहाता येथे १.५६ कोटी रुपये खर्चाचा ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारणीस मंजुरी देवून उभारणी कामाची वर्कऑॅर्डर सुध्‍दा दिलेली आहे.

या प्रकल्पातून प्रतिदिन १२५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीसाठी लिक्विडची आवश्यकता नाही. हवेतूनच ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याची माहिती देतानाच, या प्रकल्पासाठी २०० के.व्ही क्षमतेचे जनरेटर, राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात ४० बेडच्‍या प्रकल्पासाठीच्‍या ऑक्‍सिजन पाईप लाईन करीता आमदार निधीतून निधीची उपलब्धता करुन देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.