शिर्डी - शिर्डीला येणारे भाविक विश्वासाने साईबाबा संस्थानच्या भक्त निवासातील रुम बुक करणे पसंत करतात. साई संस्थानकडूनही भक्तांना ऑनलाइन बुकींग करुनच शिर्डीत येण्याच आवाहनही केले जाते. मात्र साईभक्तांच्या आस्थेला आणि खिशाला खात्री लावण्याचे काम ऑनलाईन फसवणूक Online Cheat Sai Bhakta Niwas करणाऱ्याकडून आता केले जात आहे. साई संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातील Devotee residence by Sai Sansthan खोल्या बुक करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एक मोबाइल नंबर दिला गेला आहे. साई संस्थान मार्फत चालविल्या जाणाऱ्या द्वारावती भक्त निवासाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत. रुम बुकींगसाठी 7602853094 या नंबरवर फोन केल्यानंतर रुम बुक करण्यासाठी क्रेडीट कार् द्वारे पेमेंट करा, असे सांगत पुढील प्रक्रिय करत भक्तांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबईतील जय शर्मा यांनी बुकींग केले. मात्र ते शिर्डीला आले असता त्यांनी द्वारावती भक्त निवासाच्या बुकींग काऊंटरवर जावून चौकशी केल्यानंतर तसे काही बुकींगच झाले नसल्याचे समोर आले आहे. ज्या मोबाईल नंबर वर संभाषण करत रुम बुक केली गेली होती त्यावर पुन्हा फोन केला असता अश्लील शिवीगाळ केली जात असल्याचे भविकाकडून सांगण्यात आले आहे. साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासाच्या नावाने फेक वेबसाईट तर तयार करून भाविकांना लुटल्या जात असल्याचे ईटीव्ही भारतच्या लक्षात आल्यानंतर द्वारावती भक्तनिवास या वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटवर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला.
गेल्या एक महिन्याभरापासून साई संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासच्या नावाने एक फेक वेबसाईट तयार करून मुंबई दिल्ली अशा अनेक राज्यातील भाविकांची रूम बुकिंगच्या नावा खाली लुट सुरू असल्याची बाब साईबाबा संस्थानच्या आयटी विभागाच्या लक्षात आली. त्यानंतर आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या फेक वेबसाईटवर जावून त्याचे व्युव्ह चेक केले आणि त्यावर थेट एसएमएस केली आहेत. द्वारावती भक्तनिवास या नावाची गुगलवरील ही वेबसाईट फेक असुन साई संस्थांनची online.sai.org.in ही वेबसाईट आहे. त्याचबरोबर ( 02423 ) 258775. 258960. 258500 हा फोन क्रमांक अधिकृत असून साई संस्थांच्या कुठलाही सुविधे विषय माहिती पाहिजे, असेल तर वरील वेबसाईट आणि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हानही साई संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
'फसवणुक करणाऱ्यावर कार्यवाही करु' : मुंबई आणि दिल्ली येथील काही भाविकांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार संस्थांनकडे केल्यानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांनी तातडीने ॲक्शन घेतले. द्वारावती भक्त निवासच्या नावाने फेक वेब साइट बनून भाविकांना लुटणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपल्या आयटी विभागाला दिले आहे. त्याचबरोबर कोणी व्हीआयपी दर्शनाचा नावाखाली अन्नदानाच्या नावाखाली जर भाविकांना लुटत असेल तर त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही बनायात यांनी सांगितले.
'भाविकांची फसवणुक करणाऱ्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा' : साईबाबाच्या दर्शनाचा नावाखाली तसेच अन्नदानाच्या नावाखाली अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिर्डी देणाऱ्या भाविकांना लुटल्या जात आहे. आता नवीनच थेट साई संस्थानच्या भक्त निवासाचा आणि साईसंस्थानच्या नावा फी समरुप अशा वेबसाईट तयार करुन भक्तांना लुटण्याचा नविन फंडा काही लोकांनी सुरू केला आहे. साईबाबांच्या नावाखाली भाविकांना लुटणाऱ्या लोकांवर साईबाबा संस्थानच्या वतीने ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिर्डीचे ग्रामस्थ प्रमोद गोंदकर यांनी केली आहे.