ETV Bharat / state

'या' गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा शिरकाव नाही - etv bharat special story

अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाने कहर घातला असतानाच दुसरीकडे मात्र, राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी या गावात अद्यापही कोरोनाचा शिरकाव झालेले नाही.

'या' गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा शिरकाव नाही

author img

By

Published : Apr 23, 2021, 8:22 PM IST

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाने कहर घातला असतानाच दुसरीकडे मात्र, राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी या गावात अद्यापही कोरोनाचा शिरकाव झालेले नाही. मुळा धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे अलग थलग पडलेल्या या वावरथ जांभळी गावात कोरोनाचा अद्याप शिरकावच झालेला नसल्याचे गावचे सरपंच तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

'या' गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा शिरकाव नाही

लोक वस्तीवर विभागून राहतात-

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा नदीवर 26 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या मुळा धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे काही गावे पुर्नवसीत करावी लागली आहे. तर वावरथ, जांबुळबन आणि जांभळी या गावाचा रस्ते मार्गाचा तालुक्याच गाव असलेल्या राहुरीशी संपर्क तुटला गेला आहे. या गावातील सर्व नागरिकांनाचे सर्व व्यवहार शासकीय कामासाठी, होडीने प्रवास करुन राहुरीत जावे लागते. त्यामुळे अनेक अडचणीशी सामना या लोकांना करावा लागतो. मात्र दुसरीकडे तीन गावे मिळून साडे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पोहोचणे अवघड आहे. या गावातील लोक वाड्या वस्तीवर जास्त राहत असल्याने या कोरोनाच्या काळात फदेशीरही ठरत आहे. सध्या गावातून बाहेर फारशे लोक जात येत नाही. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांपासून होणारा संसर्ग टळता येत आहे. तर लोक वस्तीवर विभागून राहत असल्याने आणी त्यातही पुरेशी काळजी घेतली जात असल्याने मागील आणि या लाटेत येथे कोरोना शिकराव झाला नसल्याचे, गावातील नागरिक सांगत आहे.

नागरीकांना होडीने प्रवास करुन राहुरीत जावे लागते

अनेकांनी गावातून बाहेर येणे-जाणे केले कमी-

वावरथ जांभळी या गावाना जाण्यासाठी रस्ते मार्गाने पारनेर नगर असा वळसा घालुन जवळपास शंभर किलोमीटरच अंतर जाव लागते. बहुतांशी जन मुळा धरणातून चालणाऱ्या होडीतून मोटर सायकल घेवून प्रवास करतात. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने अनेकांनी गावातून बाहेर येण-जाणे कमी केले आहे. लोक व्यवसायासाठी आणि इतर कामासाठी बाहेर जातात. मात्र तेही दक्षता पाळतात तर अनेकांनी बाहेर जाने टाळत असल्यामुळे होडी चालवणाऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

वावरथ जांभळी ही गावे मुळा धरणाच्या बँकवाटर मध्ये वसलेली आहेत. या गावात बहुतांशी आदीवासी, धनगर समाज असुन बहुतांशी लोक शेती आणि काही लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. या गावात चार ते पाच दुकाने आहेत. त्यामुळे गर्दी होण्याचा प्रश्नही नाही. दुसरीकडे नैसर्गीक वातावरण आणि चांगली शारीरीक क्षमता यामुळेही येथील लोकांना कोरोनाने घेरले नसावे, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. नैसर्गीक आणि भैगोलीक रचनेमुळे या गावातील लोक इतर सुख सुविधांपासुन वंचीत आहेत. मात्र हीच परीस्थीती त्यांना आज कोरोनापासून वाचवत आहे.

हेही वाचा - सकारात्मक; ९० वर्षाच्या वृद्धाने दोन वेळा कोरोनाला हरवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.