नेवासा - तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री जुन्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे ) हा युवक जखमी झाला. त्याच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबद मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भेंडा येथील सोमनाथ तांबे व त्याचे इतर 5 ते 6 मित्र रविवार 2 मे रोजी रात्री भेंडा येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना रात्री नऊच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात चुकून गोळी लागल्याने सोमनाथ गंभीर जखमी झाला. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
दरम्यान, हल्लेखोरांचा इतर दुसऱ्या कोणालातरी लक्ष करायते होते, परंतु सोमनाथ मधे आल्याने त्याला गोळी लागली असे सांगितले जाते. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी सोमनाथ तांबे यांच्या जबाबावरून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिली.