अहमदनगर - जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन या खेडे गावात शेतकरी कुटुंबातील एकाला कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
राज्यासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. जामखेड, नेवासा अहमदनगर, संगमनेर आणि राहाता तालुक्यानंतर सोमवारी श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन या खेडे गावात शेतकरी कुटुंबातील एकाला कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णावर पुणे येथील ससुण रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे नेण्यापुर्वी त्याने श्रीरामपुर तालुक्यातीलच हरेगाव येथे आणि नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले होते.
सोमवारी या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींना तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान सोमवारी लोणी येथून नगर येथे तपासणीसाठी नेलेल्या 41 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यांच्यासह एकूण ५५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणासाठी शिर्डीत ठेवण्यात आले आहे. तर, नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही २४ आहे.