ETV Bharat / state

पाटाच्या पाण्यावरून वाद; मारहाणीत एकजण गंभीर

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर नागरगोजे (वय - २४) याला पाटाच्या पाण्यावरुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

ahmednagar crime news
पाटाच्या पाण्यावरून वाद; एकजण गंभीर
author img

By

Published : May 15, 2020, 10:41 AM IST

Updated : May 15, 2020, 11:59 AM IST

अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर नागरगोजे (वय - २४) याला पाटाच्या पाण्यावरुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

संबंधित प्रकार 3 मे रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रात्री ११:३० च्या सुमारास ज्ञानेश्वर नागरगोजे याला चारीचे पाणी पळवल्या प्रकरणी दोघांनी मारहाण केली. वैभव हरिभाऊ सानप यांनी संबंधित प्रकरणी तक्रार दिली असून भा.दं.सं.नुसार 307, 504, 34 प्रमाणे चित्तरंजन रामा घुमरे आणि प्रियरंजन रामा घुमरे यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

पाटाच्या पाण्यावरून वाद; एकजण गंभीर

जखमी ज्ञानेश्वरला मानेच्या हाडांना जबर मारहाण झाल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी हालवण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी पुण्याला हालवण्यात आले आहे. मात्र, आता संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याला घरी जाण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर शेवगाव येथील बडे मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये ज्ञानेश्वरवर उपचार सुरू आहेत.

मारहाण झाल्याने कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी ज्ञानेश्वरच्या आईने केली आहे.

Last Updated : May 15, 2020, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.