अहमदनगर - महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे कार्यक्रम 2 जानेवारी ते 8 जानेवारी अशा 'रेझिंग डे' सप्ताहामध्ये साजरे करण्यात येतात.
यंदा अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. 9 जाने.) अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..