शिर्डी: उपवास म्हटल की साबुदाना खिचडी प्रतेक घरात बनते. मात्र ज्या ठिकाणी दिवसाला तीस हजार भाविक प्रसाद घेणार असतील तर किती साबुदाना खिचडी बनत असेल शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात तब्बल दहा टन साबुदाना खिचडी बनवली गेली. आषाढीला पंढरपुरात विठोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते त्या पाठोपाठ देशातील दोन नंबरचे देवस्थान असलेल्या साईच्या शिर्डीत ही आषाढीला भाविक मोठी गर्दी होत असते. त्यात आषाढी रविवारी आल्याने गर्दीत अधिकच भर पडली होती. साईमंदीरालाही फुलांची आकर्षक सजावट केली गेली होती.
साबुदाण्याची खिचडीचा प्रसाद : उपवास म्हटल की बहुतांशी लोक साबुदान्याची खिचडी खाण्यास पसंती देतात. त्यामुळे एरव्ही साईबाबा संस्थान मार्फत चालविल्या जात असलेल्या प्रसादालयात चपाती,दोन भाज्या,दाळ,भात अस भोजन म्हणून मोफत भक्तांना दिल जात. मात्र आषाढीला आणि महाशिवरात्रीला अनेक भाविकांना उपवास असल्याने या दोन्ही सनाला साई प्रसादालयात साबुदाण्याची खिचडी आणि शेगंदाण्याच झिरक प्रसाद स्वरुपात दिल जात. साईदर्शना नंतर अनेक भक्त प्रसादालयात जावुन खिचडीचा प्रसाद ग्रहण करतात.
7000 किलो साबुदाना: साई संस्खानच्या प्रसादालयात एकाच वेळी तीन हजार भाविक प्रसाद ग्रहऩ करु शकतात एका दिवसात तीस ते चाळीस हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. उत्सवात हा आकडा अधिक होतो. त्यामुळे साई संस्थान प्रसादालयात व्यवस्थापन कडुन आषाढीला 7000 किलो साबुदाना, 4500 किलो शेंगदाने 1200 किलो वनस्पती तुप, 2500 बटाटा आणि 150 किलो हिरवी मिरची अशी सामुग्री वापरत शाबुदाणा खिचडी बनविन्यात आली. दिवसभरात तब्बल दहा टनाची साबुदाना खिचडी बनवून ती भक्तांना जेवण म्हणुन घातली जाते. आषाढीच्या दिवशी दुपारी तीन वाजे पर्यंत 25 हजार भाविकांनी प्रसादालयात येवुन खिचडी खाली होती तर याच बरोबरीने पंचवीस हजार साबुदाना, खिचडी ( नाष्टा पाकीट ) पाकीटांची विक्री झाल्याची माहीती प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी दिली आहे.
हेही वाचा : Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हजारो साई भक्त शिर्डीत दाखल