अहमदनगर - जिल्ह्यातील शिर्डीजवळील राहाता येथे राजहंस काच दुकानात एका वृद्ध महिलेने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याद्वारे पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
राहाता शहरात राजहंस काच दुकान आहे. या दुकानाचे मालक शुक्रवारी दुपारच्या सुमारास दुकानमालक चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी या महिलेने दुकानात शिरून तीन ड्रील मशीन चोरून नेल्या. मालक परत आला असता त्याला सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही तपासले असता ही महिला चोरी करताना आढळून आली. त्यानंतर दुकानमालकाने राहाता पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच शहरात सध्या भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या चोरांना आवर घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.