अहमदनगर - जिल्ह्यातील आणखी 3 रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले. या रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 झाली आहे. मात्र आणखी 5 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होत असून नागरिकांनी मुळात प्रादुर्भाव होऊ, नये यासाठी काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 32 वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील 24 वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील 56 वर्षीय व्यक्ती कोरोनातून बरे झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी त्यांना निरोप देऊन पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात आणखी 5 नवीन रुग्ण -
अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील पंचवीस वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील तीस वर्षीय युवक कल्याण येथून येऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. कल्याण येथे अग्नीशमन दलामध्ये कर्मचारी असलेल्या व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली. घुलेवाडी संगमनेर येथील 35 वर्षीय युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. तो कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता. कोले तालुक्यातील कोतुळ येथील 32 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे, तो घाटकोपरहून गावी आला होता.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 152
- महानगरपालिका क्षेत्र 25
- अहमदनगर जिल्हा 77
- इतर राज्यातून आलेले 2
- इतर देशातून आलेले 8
- इतर जिल्ह्यातून आलेले ४०
- जिल्ह्यातील अॅक्टिव्ह केसेस 69
-एकूण स्त्राव तपासणी 2 हजार 507 (निगेटिव्ह 2 हजार 242, रिजेक्टेड 25, निष्कर्ष न निघालेले 17 अहवाल, बाकी 71)