ETV Bharat / state

'टायमिंग हुकलं का क्वॉलिटी खराब,' वादग्रस्त वक्तव्यावरुन इंदोरीकर महाराज अडचणीत

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य त्यांनी एका कीर्तनात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंदोरीकर महारांजावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

इंदोरीकर महाराज
इंदोरीकर महाराज
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:33 PM IST

Updated : Feb 11, 2020, 7:55 PM IST

अहमदनगर - कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेले वक्तव्य 'पीसीपीएनडिटी अ‌ॅक्ट'नुसार (प्रसूतिपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायदा) अपराध आहे. त्यामुळे, अहमदनगरच्या पीसीपीएनडिटी सल्लागार समितीने त्यांच्याविरोधात नोटीस काढली आहे.

प्रसूतिपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य त्यांनी एका कीर्तनात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंदोरीकर महारांजावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

हेही वाचा - कोल्हापूरकरांचा नादच खुळा... धावण्याची स्पर्धा जिंकल्याच्या आनंदात केला हवेत गोळीबार

संबधित वक्तव्य असलेल्या कीर्तनाचे प्रसारित व्हिडीओ आणि वृत्तपत्रातील बातम्यांवर पीसीपीएनडिटीच्या सल्लागार समितीने इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. याला इंदोरीकरांच्यावतीने अजून प्रतिसाद मिळालेला नाही.

Intro:अहमदनगर- किर्तनातील एका वक्तव्यामुळे प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_pcpndt_action_pkg_7204297

अहमदनगर- किर्तनातील एका वक्तव्यामुळे प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस..

अहमदनगर- आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे सध्या आपल्या एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेले वक्तव्य पीसीपीएनडिटी ऍक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे. इंदोरीकर महाराजांनी नेमके काय वक्तव्य केलते ते ऐकू या..

या वक्तव्याने हभप इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे..

पीसीपीएनडिटी च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडीओ, वृत्तपत्रातील बातम्या यावर आता हभप इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे, यामुळे आपल्या कीर्तनातून प्रबोधनासोबतच हास्यफुलवणार्या महाराजांच्या चेहर्यावर चिंतेची लकेर उमटली असणार आहे.. आता इंदोरीकर महाराज या गोष्टीला कसा प्रतिवाद करणार की एखाद्या कीर्तनातून आपल्या मिश्किल शैलीत समाचार घेणार हे येणाऱ्या काळात पुढे येणार आहे..

बाईट-प्रदीप मुरंबीकर -जिल्हा शल्य चिकित्सक -अहमदनगर..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- किर्तनातील एका वक्तव्यामुळे प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस..
Last Updated : Feb 11, 2020, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.