ETV Bharat / state

बहुरुपींच्या मुलांना शासकीय सेवेत समाविष्ट करा; बहुरुपवाडीची मागणी

जामखेडमधील बहुरुपवाडीतील बहुरुपी समाजाने सरकारने त्यांच्या मुलांना सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनंती केली आहे.

bahurupi in ahmednagar
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jan 28, 2020, 3:13 PM IST

अहमदनगर - जामखेड तालुक्यातील बहुरुपवाडी हे जवळपास 150 बहुरुपींचे वास्तव्य असलेले गाव आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे बहुरुपी कधी पोलीस, कधी डॉक्टर, तर कधी वकीलाच्या पोशाखात वावरत असतात. सतत भटकंती करणाऱ्या या समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. भटक्या विमुक्त जमातीत येणाऱ्या या समाजाचा विचार सरकारने करावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी जामखेड बहुरुपी संघटना कार्यरत आहे.

सरकारने बहुरुपी समाजाच्या मुलांना सरकारी नोकरीत करावे

याच समाजातील साहेबराव चव्हाण यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे. तसेच सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे. यापूर्वी त्यांनी ही मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. आता थोरात सत्तेत असल्याने ते या समाजाचे प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा चव्हाण यांनी वर्तवली आहे.

Intro:नाशिक - दिंडोरी तालुक्यात बहूरूपी हे दरवर्षी येत असतात परंतू यावर्षी नगर जिल्हयातील जामखेड तालुक्यातील बहूरुपवाडी येथील बहूरुपी दरवर्षी कधी डॉक्टर , कधी वकील , कधी पोलीस , कधी पोलीस निरीक्षक अश्या वेगवेगळ्या रूपाने बहूरुपी प्रत्येक खेडयात वाडया वस्त्यावर जावून ग्रामस्थांना आपल्या बोली बच्चन करून हसवत असतात व ग्रामस्थाच्या मनोरंजनातून जे काही दोन पैसे भेटतात त्यातून आपला गावाकडील संसाराचा गाडा हाकत असतात Body:बहूरुपवाडी ता जामखेड ही सुमारे दिडशे ते दोनशे बहूरुपी या वाडीवर असून संपूर्ण महाराष्ट्रात ते भटकंती करत आपली कला लोकांना दाखवित असता कधी सासूचलग्न चाळीस तारखेला कुलूप लावत नाही जेवायला कमी नाही , हायब्रेटचे लाडू आहेत लिंबोडाचा शिरा आहे शेबळा ची कढी आहे हाथ बांधून खावा तोंड बांधून निघा लग्नाला निघा व आपला विस एकर उस आहे पतरावर पाईपलाईन आहे फक्त जेवायच वांधा आहे असे सांगत बहूरुपी ग्रामीण भागात मनोरंजनाची कामे आजही करत आहेत Conclusion:मागील पंचवार्षीक ला बाळासाहेब थोरात आमच्याकडे आले होते त्यांना आम्ही आमच्या समश्या सांगीतल्या परंतू तेव्हा ते सत्तेत नव्हते आता सत्ता मिळाली आहे आता तरी आमच्या मुलांना शासकीय नोकरीत समाविष्ठ करून घ्यावे एवढी आमची अपेक्षा आहे .
बाईट साहेबराव चव्हान बहूरुपी जामखेड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.