ETV Bharat / state

राज ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला नाही, सोनई पोलिसांची माहिती

मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचा ताफा अहमदनगरमधून औरंगाबादकडे जात असताना जिल्ह्यातील घोडेगाव (ता. नेवासा) येथे त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला किरकोळ अपघात झाल्याची आणि या वाहनात मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी आणि केदार शिंदे असल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताच अपघात झाला नाही, अशी माहिती सोनई (ता.नेवासा) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी दिली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Apr 30, 2022, 8:34 PM IST

अहमदनगर - मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचा ताफा अहमदनगरमधून औरंगाबादकडे जात असताना जिल्ह्यातील घोडेगाव (ता. नेवासा) येथे त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला किरकोळ अपघात झाल्याची आणि या वाहनात मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी आणि केदार शिंदे असल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताच अपघात झाला नाही, अशी माहिती सोनई (ता.नेवासा) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी दिली. ताफ्यातील कोणत्याही वाहनाला अपघात झाला नसल्याचे ते म्हणाले. शनिवार (दि. 30 एप्रिल) असल्याने या रस्त्यावर वाहतूक जास्त असते. त्याच्यातील ताफ्यातील वाहने आणि इतर वाहने यांची संख्या मोठी होती. आपण स्वतः ताफ्यासोबत होतो, असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे ते म्हणाले.

वार तोच शनिवार, पण जेवण बदलले - राज ठाकरे मागे एकदा पुण्याहून औरंगाबादकडे जाताना अहमदनगर शहराजवळ असलेल्या केडगाव येथे खास थांबून मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलवर थांबून त्यांनी सामिष आहार घेतला होता. दरम्यान, हनुमान चालीसा मुद्दा पुढे आल्यावर त्यांनी शनिवारी ( दि. 30 एप्रिल ) केलेल्या सामिष आहारावरून नेटकर्यांनी चर्चा घडवून आणली होती. आज औरंगाबादच्या दिशेने जाताना राज ठाकरे केडगावातच दुपारच्या जेवणासाठी थांबले. मात्र, यावेळी त्यांनी शुद्ध शाकाहारी आहार घेणे पसंत केले.

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : अहमदनगरमध्ये राज ठाकरेंचे भव्य स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.