शिर्डी (अहमदनगर) - विमानतळाचे नाइट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यास तांत्रिक मंजुरीसाठी नागरी उड्डाण संचालनालयाकडे (डीजीसीए) पाठविण्यात आले आहेत. त्यांचे पथक शिर्डी विमानतळावर येऊन कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या ठिकाणी रात्रीची विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी " ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली आहे.
'काम अंतिम टप्प्यात'
येत्या दीड महिन्यात मंजुरी मिळून येथे नाइट लँडिंग सुरू होऊ शकते. डीजीसीएकडे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने मंजुरीसाठी कागदपत्रे पाठविली आहेत. यासाठी विविध कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणी करूनच डीजीसीए परवानगी देत असते. रनवे, दिवे व इतर नाइट लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, शिर्डी विमानतळावरून सध्या इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन विमानकंपन्या विमानसेवा देत आहेत. दररोज दहा विमाने जातात, दहा विमाने येतात. आता 27 तारखेपासून गो एअर ही विमानकंपनी विमाने सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी शिर्डीतून विमान उड्डाणासाठी डीजीसीए व महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. त्याच्याही परवानगीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
'15 विमाने ये-जा करतील'
दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, मुबंई व चेन्नई या ठिकाणी ही कंपनी विमाने सुरू करणार आहे. ही सर्व विमाने एअरबस 320 आहेत. या विमान कंपनीस 27 तारखेपासून परवानगी मिळाली तर 3 कंपन्या मिळून दररोज 15 विमाने ये-जा करतील, असे ते म्हणाले.