शिर्डी : गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. अखेर आज भाविकांची प्रतीक्षा संपली शनिवारी 8 एप्रिल रोजी इंडिगोचे पहिले विमान दिल्लीहून रात्री उशिरा शिर्डीत दाखल झाले आहे. दिल्लीवरुन सायंकाळी 6.23 वाजता निघालालेले विमान 231 प्रवाशांना घेऊन रात्री 8.10 वाजता शिर्डी विमानतळावर दाखल झाले. पुन्हा इंडिगोचे विमान 231 प्रवाशांना घेऊन शिर्डी विमानतळावरून रात्री 9 वाजता दिल्लीसाठी रवाना झाले. शिर्डी विमानतळावरील नाईट लोडिंग सुविधेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. येता पंधरा-वीस दिवसांत नियमित विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती शिर्डी विमानतळ संचालक सुशील श्रीवास्तव यांनी दिली आहे.
नाईट लँडिंग सुविधेसाठी परवाना : गेल्या 16 फेब्रुवारीला DGCA ने शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेसाठी परवाना मंजूर केला. या सुविधेमुळे शिर्डी विमानतळावर विमानांची, प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. इंडिगो विमानाला नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा पहिला मान मिळाला आहे. इतर विमान कंपन्याही लवकरच उड्डाणे सुरू करण्यास उत्सुक आहेत. पुढील आठवड्यात चेन्नईसाठी रात्रीची सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या दिल्ली, चेन्नई, बंगळुरूसाठी प्रत्येकी दोन, इंदूर, विशाखापट्टणम, हैदराबादसाठी प्रत्येकी एक अशा नऊ एअरलाइन्सद्वारे 18 उड्डाणे सुरू आहेत. सध्या दररोज दोन हजारांहून अधिक भाविक ये-जा करण्यासाठी या विमानतळाचा वापर करत आहेत. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत 33 हजार 800 भाविकांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला आहे. तसेच वर्षभरात 5 हजार 475 विमाने येथे येऊन गेली आहेत. शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील श्रीवास्तव यांनी नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे.
रात्रीच्या विमानसेवेला नागरिकांचा प्रतिसाद : रात्रीच्या विमान सेवेमुळे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांमध्ये आनंद, उत्साह दिसून येत आहे. शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील श्रीवास्तव यांनी या प्रवाशांचे केक कापून स्वागत केले तर विमानतळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रवाशांचे स्वागत केले. या विमानसेवेमुळे देशांतर्गत प्रवाशांना एकाच दिवसात साईदर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ, श्रम वाचणार आहेत. या विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनल इमारतीसाठी राज्य सरकारने मार्चमध्ये ५२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर 'नाईट लँडिंग' सुविधा सुरू झाल्याने शिर्डी, परिसराच्या प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत.
Shirdi Airport : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; आता रात्रीसुद्धा शिर्डीत विमानाने येऊ शकता, ना्ईट लँडिंग चाचणी यशस्वी - साईबाबा आंतरराष्ट्रीयविमानतळ
शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून विमानाने येणाऱ्या भाविकांची अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. 8 एप्रिल 2023 पासून साईबाबा आंतरराष्ट्रीयविमानतळावर नाईट लॅन्डीग सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. दिल्लीहून निघालेले इंडिगोचे पहिले विमान 231 प्रवाशांना घेऊन शिर्डी विमानतळावर शनिवारी रात्री 8.10 वाजता दाखल झाले होते.