ETV Bharat / state

खासदार गांधीच्या अपमानाचा बदला घेत उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदार परतवून लावतील - अंकुश काकडे - अहमदनगर

पंतप्रधानांनी शेतकरी, रोजगार आदी विषयांवर दिलेल्या आश्वासनावर एकही शब्द न बोलता केवळ व्यक्ती द्वेषातून शरद पवार यांच्यावर टीका केली, असेही काकडे म्हणाले.

अंकुश काकडे
author img

By

Published : Apr 14, 2019, 9:02 AM IST

अहमदनगर - विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांचा पंतप्रधान मोदींच्या सभेत झालेल्या जाहीर अपमानाचा बदला येथील जनता निश्चित घेणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उत्तरेतून झालेले आक्रमण जनता परतवून लावेल आणि आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया

संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरात संपूर्ण दिवसभर प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांमध्ये उमेदवार संग्राम जगताप यांच्यासह अंकुश काकडे आणि इतर अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. माध्यमांशी बोलताना अंकुश काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी पार पडलेल्या सभेवर टीका केली. पंतप्रधानांनी शेतकरी, रोजगार आदी विषयांवर दिलेल्या आश्वासनावर एकही शब्द न बोलता केवळ व्यक्ती द्वेषातून शरद पवार यांच्यावर टीका केल्याचे सांगितले.

भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा व्यासपीठावर झालेला अपमान येथील जनता विसरणार नाही. मतदानातून भाजपला धडा शिकवण्याचे काम येथील जनता करेल. गेल्या २ निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात अपयश आले असले तरी यावेळेस संग्राम जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादी पक्षाचा खासदार विजयी होवून दिल्लीत जाईल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

Intro:अहमदनगर-खा.गांधींच्या अपमानाचा बदला घेत उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदारपरतवून लावलीतल.. -अंकुश काकडे.
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_14_april_ahm_trimukhe_1_ncp_city_rally_v

अहमदनगर-खा.गांधींच्या अपमानाचा बदला घेत उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदारपरतवून लावलीतल.. -अंकुश काकडे.

अहमदनगर- विद्यमान भाजप खा. दिलीप गांधी यांचा पंतप्रधान मोदींच्या सभेत झालेला जाहीर अपमानाचा बदला येथील जनता निश्चित घेणार असून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उत्तरेतुन झालेले आक्रमण परतवून लावेल आणि आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नगर जिल्ह्याचे पक्षाचे संपर्क नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला आहे. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरात संपूर्ण दिवसभर प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची आरती करून या रॅलीला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागांमध्ये उमेदवार संग्राम जगताप यांच्यासह अंकुश काकडे आणि इतर अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ठिकाणी महिलांनी संग्राम जगताप त्यांचं औक्षण करून आणि तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना अंकुश काकडे यांनी दक्षिण नगर जिल्ह्यातून संग्राम यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतानाच येथील जनता उत्तरेतून आलेल्या डॉक्टर सुजय विखे यांचे आक्रमण परतवून लावले आणि आघाडीच्या उमेदवाराला विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी पार पडलेल्या सभेवर काकडे यांनी टीका केली. पंतप्रधानांनी शेतकरी, रोजगार आदी विषयांवर दिलेल्या आश्वासनावर काही एक शब्द न बोलता केवळ व्यक्ती द्वेषातून शरद पवार यांच्यावर टीका केली केल्याचे सांगितले. त्याचबरोबर भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा व्यासपीठावर झालेला अपमान येथील जनता विसरणार नाही, मतदानातून भाजपला धडा शिकवण्याचे काम येथील जनता करेल असेही काकडे म्हणाले. गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला या मतदारसंघात अपयश आले असले तरी यावेळेस संग्राम जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादी पक्षाचा खासदार विजयी होऊन दिल्लीत जाईल असा विश्वासही काकडे यांनी व्यक्त केला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर-खा.गांधींच्या अपमानाचा बदला घेत उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदारपरतवून लावलीतल.. -अंकुश काकडे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.