अहमदगर - शिवाजीराव गर्जे व अदिती नलावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्जे हे पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव गावचे रहिवासी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ते पवारांसोबत काम करताता. त्यांना भारतीय प्रशासन सेवेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. तर प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांनाही राष्ट्रवादीने संधी दिली आहे. दोघेही आज आमदारकीची शपथ घेणार आहेत.
हेही वाचा -'भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता'
राष्ट्रवादीकडून 6 वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. त्यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. दुसरे राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदाकीचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्याने राष्ट्रवादीने तातडीने आपले दोन नवीन चेहरे विधान परिषदेवर देण्याचा निर्णय घेतला आहे.
अदिती या विधानसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांची पुतणी आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा परिचय आहे. तर गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील कामकाज पाहतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या टप्प्यात अमोल मिटकरी यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी या दोघांना संधी मिळाली आहे.
हेही वाचा - अण्णांचे 20 डिसेंबरपासून मौनव्रत; निर्भयाच्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची केली होती मागणी