ETV Bharat / state

वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, रविवारी देणार आमदारकीचा राजीनामा - मुख्यमंत्री

वैभव आणि माझ्याशी मुख्यमंत्र्यांची मनमोकळी चर्चा झाली. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, जावडेकर यांच्याशी चर्चा केली. राधाकृष्ण विखे पाटीलदेखील प्रत्येक वेळी सोबत होते. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे मधुकर पिचड यांनी सांगितले.

आमदार वैभव पिचड
author img

By

Published : Jul 27, 2019, 4:17 PM IST

Updated : Jul 27, 2019, 5:36 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे चिंरजीव आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी वैभव रविवारी आमदारकीचा राजीनामा देतील. त्यानंतर येत्या ३० किंवा ३१ जुलैला त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे मधुकर पिचड यांनी सांगितले. आज ते शिर्डीत बोलत होते.

वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, रविवारी देणार आमदारकीचा राजीनामा

आज देश बदलला आहे. देशातील वातावरण बदलले आहे. 'विकासाच्या बाजूने जायचे की, प्रवाहाच्या विरोधात जायचे,' हा प्रश्न होता. तसेच दुसरीकडे शरद पवार यांनी आजवर मोठी साथ दिली. त्यामुळे निर्णय घेणे खूप अवघड होते. त्यानंतर वैभव आणि माझ्याशी मुख्यमंत्र्यांची मनमोकळी चर्चा झाली. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, जावडेकर यांच्याशी चर्चा केली. राधाकृष्ण विखे-पाटीलदेखील प्रत्येक वेळी सोबत होते. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रवेशाने अनेकजण टीका करतील. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. शिवाय आता निवडणूक लढणार नसल्याचेही मधुकर पिचड यांनी स्पष्ट केले.

अकोले शहराच्या विकासाठी भाजपमध्ये प्रवेश - वैभव पिचड

अकोले शहराचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो. विरोधी पक्षात असताना खूप अडचणींना सामोर जावे लागले. विरोधी पक्षात असताना फक्त ३ किलोमीटरचा रस्ता मिळाला. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघात अनेक विकासकामे झालेली आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्यण घेतला असल्याचे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.

पक्ष बदलण्याचा विचार आला त्यावेळी मातोश्री हेमलता यांनी विरोध केला. मात्र, अकोल्याच्या विकासाठी पर्याय नव्हता. केवळ आमदार होणे अपेक्षीत नाहीतर जनतेची कामे महत्त्वाची आहेत. जनतेला न्याय मिळत नसेल तर आमदार असून काय फायदा? असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा फोन आला त्यावेळी त्यांना सांगितले की, भाजपमध्ये येतो. मात्र, अकोल्याच्या जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील. त्यांनी शब्द दिल्यानंतरच भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे वैभव म्हणाले. यासोबतच त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. तसेच भाजपमधील फडणवीस, चंद्रकांत पाटील, विखे पाटील, राम शिंदे, गिरीश महाजन यांचे देखील आभार मानले.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

मधुकर पिचड भाषण...

माझ्यावर राजकीय वार झाले , व्यक्तीगत टिकाही झाली....

कोणताही निर्णय घेताना सर्वांना विचारात घेऊन घेणार ...
आज देश बदललला, वातावरण बदललंय....
विकासाच्या बाजूने जायचं..? कि प्रवाहाच्या विरोधात हा माझ्यापुढे प्रश्न होता ...
आदरणीय पवार साहेबांची मला आजवर मोठी साथ मिळाली...
मला आता काहीही मिळवायचं नाहीये...
कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही...
मधुकर पिचड यांची घोषणा...
निर्णय घेणं खुप अवघड होतं...
वैभव आणी माझ्याशी मुख्यमंत्र्यांची मनमोकळे पणाने चर्चा झाली...
चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, जावडेकर, यांच्याशीही चर्चा...
विखे साहेबही प्रत्येक ठिकाणी सोबत...
आपण भाजपात आलात तर आम्हालाही आनंद .. भाजप नेत्यांच्या भावना...
उद्या वैभव पिचड आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार ...
30 किंवा 31 जुलैला होणार पक्षप्रवेश...
17 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची अकोले येथे सभा...
भाजपात प्रवेश केल्याने आपल्यावर टिका होणार ..
मात्र त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका...
मधुकर पिचड यांचे कार्यकर्त्यांना आवाहन...
आदरणीय मोदींच्या विचाराच्या बाजूने जायचंय...
आजवर ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचा ॠणी...
माझा कोणावरही राग नाही ...
मधुकर पिचड यांची स्पष्टोक्ती...Body:MH_AHM_Shirdi_Madhukar Pichad_Visuals_Bite_MH10010

Conclusion:MH_AHM_Shirdi_Madhukar Pichad_Visuals_Bite_MH10010
Last Updated : Jul 27, 2019, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.