ETV Bharat / state

राष्ट्रवादीला गळती सुरूच, 'हा' आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार? - वर्षा

आमदार वैभव पिचड यांनी मंगळवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर बुधवारी (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर ते नेमके भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेनेमध्ये या चर्चांना उधाण आले

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का... 'हा' नेता ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार
author img

By

Published : Jul 26, 2019, 4:19 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार वैभव पिचड यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात पार पडली. यावेळी वैभव पिचड यांच्या उपस्थितीत अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना राजीनामे पाठविण्यात आले आहेत.

आमदार वैभव पिचड यांनी मंगळवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर बुधवारी (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर ते नेमके भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेनेमध्ये या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (२६ जुलै) दुपारी तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली. बैठकीला आमदार वैभव पिचड हे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, अशा आशयाची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

उद्या (शनिवारी) पंकज लॉन्स येथे अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी दिली. कार्यकर्त्यांचा मेळाव्यानंतर वैभव पिचड आपला निर्णय घेणार असल्याचे बोलले जात असले, तरी मंगळवारी (३० जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

आमदार वैभव पिचड यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक अकोले येथील अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी वैभव पिचड यांच्या उपस्थित अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना राजीनामे पाठविले आहे....

आमदार वैभव पिचड यांनी मंगळवारी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर बुधवारी (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर ते नेमके भाजप की शिवसेनेमध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (२६ जुलै) दुपारी तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार वैभव पिचड हे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभवराव पिचड हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा आशयाची भावना राष्ट्रवादी काँगेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या....

उद्या शनिवारी पंकज लॉन्स येथे अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी दिली. कार्यकर्त्यांचा मेळाव्या नंतर वैभव पिचड आपला निर्णय घेणार असल्याचे बोलले जात असले तरी मंगळवारी (३० जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रानी दिले....Body:MH_AHM_Shirdi_Vaibhav Pichhad_26_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Vaibhav Pichhad_26_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.