शिर्डी (अहमदनगर) - नगर जिल्हा मोठ्या राजकारण्यांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यातील अनेकांनी निळवंडे धरणाचं पाणी येईल म्हणुन निवडणुका लढविल्यात मात्र प्रश्न प्रलंबित राहिलेत. प्राजक्त तनपुरे यांनी जयंत पाटलांकडे आता पाठपुरावा सुरु केलाय. यावर अजित पवार यांनी आता मामाला सोडू नको, नाहीतर माझाच मामा व्हायचा, असं सांग अशी मिश्किल टिप्पणी करत विरोधकांवर टीका केली. राष्ट्रवादीचं सरकारच निळवंडेच काम करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत प्रकल्पाच विविध ठिकाणी त्यांनी भुमिपुजन केलं. त्यानंतर राहुरीत आयोजित प्रचारसभेत अजित पवार यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच हिसाचार घडवून आणल्याचे म्हटले. अण्णा हजारेही आजपासुन आंदोलन करणार होते मात्र भाजपवाल्यांनी त्यांच्याकडे चकारा मारून त्यांना कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिलंय. आता अण्णांनी त्यावर विश्वास ठेवलाय. खरंतर अण्णांवर उपोषण करण्याची वेळच येवु द्यायची नव्हती. ती आणली हाच सरकारचा नाकर्तेपणा आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली आहे.
विकासकामांसाठी 'मामा’ची मदत घ्या, नाहीतर माझाच मामा करू नका, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी - राष्ट्रवादी नेते जयंत पाटील
नगर जिल्ह्यातील अनेकांनी निळवंडे धरणाचं पाणी येईल म्हणुन निवडणुका लढविल्यात मात्र प्रश्न प्रलंबित राहिलेत. प्राजक्त तनपुरे यांनी जयंत पाटलांकडे आता पाठपुरावा सुरु केलाय. यावर अजित पवार यांनी आता मामाला सोडू नको, नाहीतर माझाच मामा व्हायचा, असं सांग अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे.