अहमदनगर - कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा आयोजीत केली होती. यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
स्वतःच ठेवायचं झाकून अन..
आमचे साखर कारखाने काटेखोरपणे चालणारे आहेत, पण पंकजा मुंडे, देशमुखांच्या कारखान्यांचे काय ? उगाच आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, असे वागू नका, तुम्ही बारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, अशा शेलक्या शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
हेही वाचा... 'भाजप-सेनेचं दिवाळं काढल्याशिवाय दिवाळी साजरी करायची नाही'
विरोधकांवर टीकास्त्र...
आम्हाला मत दिले नाही तर बघून घेऊ, असे विरोधी उमेदवार म्हणतात. सरकारने दिलेले दोन हजार रुपये परत मागता आणि चारा छावण्याची बिले अडवून ठेवतात. राम शिंदे कुठे फेडाल हे पाप, असे म्हणत अजित पवार यांनी राम शिंदे यांना धारेवर धरले.
हेही वाचा... तुम्ही महाराष्ट्राच्या भविष्याचे मारेकरी - अमोल कोल्हे
गुजरातचे नेते सध्या महाराष्ट्रात येऊन 370 कलमवर बोलत आहेत. पण जम्मू काश्मीर कुठे, गुजराथ कुठे आणि महाराष्ट्र कुठे.. असा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी कर्जत-जामखेडच्या जनतेला कुकडी-घोडच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यावर बोला असा सवाल पवारांनी यावेळी केला.
हेही वाचा... ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार
राज्यात लक्षवेधी लढत ठरत असलेल्या अजित पवार यांनी, कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले पुतण्या रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राशीन येथे सभा घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.