ETV Bharat / state

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : कोल्हापूरच्या रेश्माने दिल्लीच्या अनिताला चितपट करत जिंकले सुवर्णपदक - Kolhapur Wrestler reshma mane

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा सिकंदर शेख याने सुवर्णपदकाची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा रोवला. कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने ६२ किलो वजन गटात दिल्लीच्या अनिताचा पराभव केला.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : कोल्हापूरच्या रेश्माने दिल्लीच्या अनिताला चितपट करत जिंकले सुवर्णपदक
author img

By

Published : Sep 29, 2019, 7:26 PM IST

Updated : Sep 29, 2019, 8:11 PM IST

अहमदनगर - शिर्डी येथे पार पडलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंचा बोलबाला राहिला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची रेश्मा माने हिने सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, राहाता तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत २६ राज्यातील शेकडो कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता.

हेही वाचा - राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : हरियाणाच्या नैना आणि पूजाला सुवर्णपदक

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा सिकंदर शेख याने सुवर्णपदकाची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा रोवला. कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने ६२ किलो वजन गटात दिल्लीच्या अनिताचा पराभव केला.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी रेश्मा माने....

दरम्यान, महिला कुस्तीपटूंची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर सुरू असलेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये रेश्मा माने हिने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या फेरीपासून आपल्या कुस्तीचा जलवा उपस्थितांना दाखवत प्रतिस्पर्ध्याला चितपट करून महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुस्तीच्या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली.

हेही वाचा - साईबाबांच्या नगरीत रंगली देशभरातील पैलवानांची 'दंगल'

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_शिर्डी येथे २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राहाता तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची रेश्‍मा हिने सुवर्णपदक पटकावून दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्राचा झेंडा फडकावला 26 राज्यांमधील शेकडो कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता....

VO_पहिल्या दिवशीच महाराष्ट्राचा सिकंदर शेख याने सुवर्णपदकाची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून कुस्तीच्या मॅट वरती महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे 26 सप्टेंबरपासून तीन दिवस सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीपटू ची फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कोल्हापुरच्या रेश्मा माने हिने 62 किलो वजन गटात दिल्लीच्या अनिता हिचा चपळाईने पराभव करत सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे आजच्या दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीगीर यांची कुस्ती बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विशेषता महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर सुरू असलेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये रेश्मा माने हिने सर्वांचे लक्ष वेधले पहिल्या फेरीपासून आपल्या कुस्तीचा जलवा उपस्थितांना दाखवत समोरच्याला चितपट करून महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुस्तीचा खेळात सुवर्ण कमाई केली....

BITE_ रेश्मा माने कुस्तीपट्टू

VO_आत्तापर्यंत पुरुषांनी कुस्तीचे आखाडे गाजवले. महाराष्ट्रामध्ये महिलां कुस्तीपटू ची संख्या कमी असली तरी रेशमाने मात्र महिला कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करत सुवर्णपदक जिंकून इतर महिलांच्या पुढे व तरुणींच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. या ठिकाणी उत्तर भारतामधील महिला कुस्तीपटूंचा सहभाग लक्षणीय दिसून येत होता.रेश्मा माने हीने सुवर्णपदकाची कमाई करताच जय महाराष्ट्राच्या घोषणा कुस्ती आखाडा परिसरामध्ये घुमत होत्या.उद्या शेवटच्या दिवशी अंतिम कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे त्यानंतर या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची सांगता होणार आहे....Body:mh_ahm_shirdi national wrestling_29_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi national wrestling_29_visuals_bite_mh10010
Last Updated : Sep 29, 2019, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.